शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

भाडेवाढ केल्यामुळे शिवशाहीचा प्रवासही महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:39 AM

राज्य परिवहन महामंडळाने एस.टी. बस प्रवासाची भाडेवाढ केल्यामुळे शिवशाही बसचा प्रवासदेखील महागणार असून, शहरातील बसभाड्यातदेखील सहा ते दहा रुपयांनी वाढ होणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून सदर भाडेवाढ लागू होणार आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने एस.टी. बस प्रवासाची भाडेवाढ केल्यामुळे शिवशाही बसचा प्रवासदेखील महागणार असून, शहरातील बसभाड्यातदेखील सहा ते दहा रुपयांनी वाढ होणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून सदर भाडेवाढ लागू होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या सेवांच्या भाड्यात वाढ करण्याला राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिल्यानुसार महामंडळाने भाडेवाढ जाहीर केली आहे.  शहरातील अंतर्गत बससेची संख्या महामंडळाने कमी केल्यामुळे प्रवाशांना पर्यायी साधनांचा वापर करावा लागत असला तरी नाशिकरोड, भगूर, कॅम्प, पंचवटी, सिडको, सातपूर, त्र्यंबकेश्वर या मार्गावरील बसेसला प्रवाशांना प्रचंड प्रतिसाद आजही कायम आहे. या मार्गावरून बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता सहा ते दहा रुपये इतके जादाचे भाडे द्यावे लागणार आहे. लहान मुलांच्या तिकीट दरातदेखील पाच रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. महामंडळाने अद्याप शहरातील अधिकृत टप्पानिहाय भाडेवाढ कळविली नसली तरी सहा ते दहा रुपयांपर्यंतची वाढ नक्कीच मानली जात आहे.  महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बसेसने प्रवास करणाºयांची संख्या वाढल्याने महामंडळाच्या उत्पन्नाला हातभार लागला आहे. सदर भाडेवाढ काही प्रमाणात जादाची असल्याची प्रतिक्रिया उमटत असल्या तरी प्रवासी या बसने प्रवास करीत आहेत.  मुंबईला जाणाºया निमआराम बसचे भाडे २६७ असून, आता ते ३१५ होणार आहे. पुण्याचे भाडे ३०८ वरून ३५५, औरंगाबादचे भाडे २९१ वरून ३४५, बोरिवली २६७ वरून ३१५, तर धुळ्याचे भाडे २३१ वरून २७५ इतके होणार आहे. नाशिक ते पुणे (निमआराम) विनावाहक सेवा व शिवनेरी सेवेकरिता ठोक भाडे आकारण्यात येणार आहे.शिवशाहीचा प्रवासदेखील महागणार असल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकहून पुण्याला जाणाºया शिवशाहीचे सध्याचे भाडे ३४६ रुपये इतके होते ते आता ४११ इतके होणार आहे. मुंबईचे भाडे ३०१ वरून ३४५, औरंगाबादचे भाडे ३२९ वरून ३७५, बोरिवलीचे भाडे ३०१ वरून ३४५, तर धुळे शिवशाहीचे सध्याचे भाडे २६६ असून नवीन भाडे ३०० रुपये होणार आहे. याप्रमाणेच रातराणी, निमआराम आणि सर्वसाधारण जलद बसेसच्या भाड्यातदेखील वाढ होणाार आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ