नाशिकहून केवळ धुळ्यासाठीच प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:00 AM2021-04-26T01:00:55+5:302021-04-26T01:02:05+5:30

राज्य सरकारने जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गंत नाशिक जिल्ह्यातून एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असली तरी, नजीकच्या धुळे जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाशिकहून दररोज धुळेसाठी चार ते पाच फेऱ्या केल्या जात असून, असाच प्रकार जिल्ह्यातील तालुकांतर्गंत केला जात आहे. मात्र एसटीतून खासगी प्रवाशांना ‘नो एंट्री’ आहे. 

Travel from Nashik only for Dhule | नाशिकहून केवळ धुळ्यासाठीच प्रवास

नाशिकहून केवळ धुळ्यासाठीच प्रवास

Next
ठळक मुद्देप्रवासी सेवा ठप्प : फक्त कर्मचाऱ्यांची वाहतूक

नाशिक : राज्य सरकारने जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गंत नाशिक जिल्ह्यातून एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असली तरी, नजीकच्या धुळे जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाशिकहून दररोज धुळेसाठी चार ते पाच फेऱ्या केल्या जात असून, असाच प्रकार जिल्ह्यातील तालुकांतर्गंत केला जात आहे. मात्र एसटीतून खासगी प्रवाशांना ‘नो एंट्री’ आहे. 
गेल्या आठ दिवसांपासून एसटी महामंडळाने राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करून त्याची अंमलबजावणी सुरू केली असून, शासनाच्या निर्देशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटीमार्फत वाहतूक करण्याचे आदेश असल्याने त्यानुसार एसटीच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातून परजिल्ह्यात प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असून, फक्त धुळे येथे शासकीय नोकरीसाठी जाणाऱ्या-येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने दररोज सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत धुळेसाठी गाड्या सोडल्या जात आहेत. प्रत्येक फेरीसाठी पंधरा ते वीस प्रवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. असाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, येवला, मनमाड, मालेगाव, इगतपुरी या तालुक्यातून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. यात प्रामुख्याने शासकीय कर्मचारी, आराेग्य कर्मचारी, पोलीस, पाणीपुरवठा या विभागातीलच कर्मचारी असून, प्रवास करू इच्छिणाऱ्यांचे ओळखपत्र पाहूनच एसटीत प्रवेश दिला जात आहे.
सेवेतून तोटाच
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची एसटीतून वाहतूक केली जात असली तरी, एसटीच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी असावेत असे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु काही तालुक्यातून अवघे चार ते पाच प्रवासी ये-जा करीत असल्याने एसटी महामंडळाला तोटाच सहन करावा लागत आहे.
 

Web Title: Travel from Nashik only for Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.