ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रवासी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 15:20 IST2020-02-02T15:19:58+5:302020-02-02T15:20:15+5:30
देवळा : देवळा बसस्थानकामध्ये देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने रथसप्तमी व प्रवासी दिनाचे औचित्य साधून प्रवासी दिन साजरा करण्यात आला.

देवळा तालुका ग्राहक पंचायततर्फे राजेश आहेर यांचा सत्कार करताना संजय भदाणे,संजय मांडगे, सहसंघटक संजय देवरे, निंबाजी आहेर, संजय भदाणे, मोबीन तांबोळी, राजेश आहेर, शशीकांत चितळे आदी.
ठळक मुद्दे यावेळी प्रवासी चालक, वाहक व वाहतूक नियंत्रक यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. वाहतूक नियंत्रक व्ही.एम.गोसावी यांनी एसटीच्या विविध सवलतीची व सुरक्षित प्रवास यासंबंधी माहिती दिली.
तसेच ग्राहक पंचायतीचे संजय भदाणे यांनी रथसप्तमी आणि प्रवासी दिनाचे महत्त्व सांगून प्रवाशांचे हक्क अधिकार व कर्तव्य यांची जाणीव करून दिली. प्रवाशांनी खासगी वाहनातून प्रवास न करता एसटीने प्रवास करण्याचे आवाहन राजेश आहेर यांनी केले. यावेळी देवळा तालुका ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक संजय मांडगे, सहसंघटक संजय देवरे, निंबाजी आहेर, संजय भदाणे, मोबीन तांबोळी, राजेश आहेर, शशीकांत चितळे आदी सदस्य उपस्थित होते.
-