वाहतूक पोलिसास टॅक्सीचालकाची दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:46 IST2018-08-12T00:45:54+5:302018-08-12T00:46:00+5:30
अवैध प्रवासी भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळीपिवळी व्हॅनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने वाहतूक पोलिसास शिवीगाळ तसेच झटापट करून दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) सकाळच्या सुमारास द्वारकाजवळ घडली़

वाहतूक पोलिसास टॅक्सीचालकाची दमदाटी
नाशिक : अवैध प्रवासी भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळीपिवळी व्हॅनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने वाहतूक पोलिसास शिवीगाळ तसेच झटापट करून दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) सकाळच्या सुमारास द्वारकाजवळ घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहर वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई नंदू गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी सकाळच्या सुमारास ते द्वारका येथील फेमस हॉटेलजवळील सर्व्हिस रोडवर कर्तव्य बजावत होते़ यावेळी संशयित फिरोज गयाउद्दीन शेख (४२, रा. घर नंबर ३८९२, नानावली) याने आपल्या ओम्नी व्हॅन (एमएच ०१, एएल ४८१६) मध्ये अवैध प्रवासी भरून त्यांची वाहतूक करीत भरधाव वेगाने व्हॅन रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालवित येत होता़ त्यास गवळी यांनी अडवून त्याच्याकडे परवाना व कागदपत्रांची मागणी केली असता त्याने कागदपत्रे न दाखविता शिवीगाळ सुरू केली़ यानंतर गवळी यांनी शेख यास शहर वाहतूक कार्यालयाकडे चालण्यासाठी सांगितले असता त्याने कॉलर पकडून झटापट तसेच शिवीगाळ केली़