शहर पोलीस आयुक्तालयातील  सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:09 IST2018-10-25T01:09:15+5:302018-10-25T01:09:36+5:30

शहर पोलीस आयुक्तालयातील डॉ़ अजय देवरे, दीपक गिºहे व बापू बांगर या तीन सहायक पोलीस आयुक्तांना शासनाने पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्तपदी पदोन्नती दिली आहे़ यामुळे पोलीस आयुक्तालयातील ही पदे रिक्त असून, शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांच्या जागेवर अशोक नखाते यांना जबाबदारी देण्यात आली आहे़

Transfers of Assistant Police Commissioner in City Police Commissionerate | शहर पोलीस आयुक्तालयातील  सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

शहर पोलीस आयुक्तालयातील  सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील डॉ़ अजय देवरे, दीपक गिºहे व बापू बांगर या तीन सहायक पोलीस आयुक्तांना शासनाने पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्तपदी पदोन्नती दिली आहे़ यामुळे पोलीस आयुक्तालयातील ही पदे रिक्त असून, शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांच्या जागेवर अशोक नखाते यांना जबाबदारी देण्यात आली आहे़  परिमंडळ दोनमधील विभाग चारचे सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर हे विभाग एकचे सहायक पोलीस आयुक्त तर रमेश पाटील यांच्याकडे विभाग दोनच्या सहायक पोलीस आयुक्ताची जबाबदारी देण्यात आली आहे़ विभाग एकचे सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील यांच्याकडे विभाग तीनची तर विभाग चारचा पदभार नवनियुक्त सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे यांच्याकडे देण्यात आला आहे़  पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस आयुक्तपदी शांताराम आडके तर प्रशासन विभागाची जबाबदारी पोलीस निरीक्षक किरण साळवी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे़

Web Title: Transfers of Assistant Police Commissioner in City Police Commissionerate