ट्रक चालक पित्याकडून झालेल्या अपघातात मुलाचा दुदैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 05:07 PM2020-02-28T17:07:42+5:302020-02-28T17:12:08+5:30

नाशिक शहर परिसरातील पेठरोड तवली फाटा ते जुना जकात नाका रस्त्यावर लातूरच्या उदगीर येथील एका ट्रकचालकाकडून झालेल्या अपघातात चालकाच्याच मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Tragic death of a child in father's accident | ट्रक चालक पित्याकडून झालेल्या अपघातात मुलाचा दुदैवी मृत्यू

ट्रक चालक पित्याकडून झालेल्या अपघातात मुलाचा दुदैवी मृत्यू

Next
ठळक मुद्देनाशिकमध्ये लातूरच्या चालकाकडून अपघातअपघातात चालकाच्या मुलाचा दुदैवी मृत्यू

नाशिक : लातूरच्या उदगीर येथील एका ट्रकचालकाकडून नाशिक शहर परिसरातील पेठरोड तवली फाटा ते जुना जकात नाका रस्त्यावर झालेल्या अपघातात त्याचाच मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर ट्रकचालकाने स्वत: म्हसरूळ पोलीस ठाण्यात जाऊन दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
पेठरोड तवली फाटा ते जुना जकात नाका रस्त्यावरून गुजरात राज्यातील वापी येथे औषधे घेऊन जाणाºया एका ट्रकने रस्त्यात उभ्या असलेल्या दुसºया ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात लातूरच्या उदगीर येथील नागेश ज्ञानोबा सुकणे (२३) हा युवक ठार झाला आहे. या प्रकरणीत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील मयत नागेश सुकणेचे वडील ज्ञानोबा मोहनराव सुकणे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुकणे हे चालक असून ते गुरुवारी (दि.२७) पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एस २४ जे ६७६५ घेऊन गुजरात राज्यातील वापी येथे नाशिकमार्गे पेठरोडने जात असताना त्यांना जकातनाका रस्त्यावर उभा ट्रक दिसला नाही सुकणे, हे उजव्या बाजूला वळण घेत असताना त्यांचा ट्रक पाठीमागून आदळला. त्यात ट्रकमध्ये पुढे बसलेला त्यांचा मुलगा नागेश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

Web Title: Tragic death of a child in father's accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.