शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूलाच्या कामामुळे वाहतुक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 13:33 IST

ओझर : सध्या मुंबई आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या संतापात दिवसेंदिवस भरच पडत आहे.

ओझर : सध्या मुंबई आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या संतापात दिवसेंदिवस भरच पडत आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाल्याचे बघण्यास मिळाले.मुंबई आग्रा महामार्गावर ओझर ते नाशिक महामार्गाचे काही वर्षांपूर्वी सहापदरीकरण झाले होते. परंतु ओझर येथील खंडेराव मंदिर,गडाख कॉर्नर, लक्ष्मीनगर, जत्रा हॉटेल, हनुमान नगर, अमृतधाम येथे कायम होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हजारो वाहनधारक त्रस्त होते. परिणामी लेट का होईना येथे कामं मंजूर झाली व तीन उड्डाणपुलांचा समावेश करण्यात आला.सदर कामांना सुरवात झाल्यानंतर येथे सकाळ सायंकाळ होत असलेली वाहतूक कोंडी वाहधारकांना डोकेदुखी ठरत असताना ती सुरळीत करण्यासाठी अमृतधाम,हनुमान नगर येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.महत्वाचे म्हणजे त्यांच्या समवेत हंगामी कर्मचारी वाहनांच्या रांगा सुरळीत करीत असताना पोलीस मात्र त्या कोंडीत भर घालत असल्याचे चित्र रोजच बघण्यास मिळत असून एकरी करण्यात आलेल्या रस्त्यावर अवजड वाहनदेखील मोठ्याप्रमाणावर येजा करत असताना समांतर सर्व्हिस रोडचा उपाय देखील उपलब्ध असून केवळ त्याचा सुरळीत अवलंब केला जात नाही.----------------------पोलीस चौकीच बनली दंड वसूलीचे ठिकाणजिथे क्र ॉसिंग आहे तिथे सर्वच प्रकारच्या गाड्यांना अडविले जाते व जोपर्यंत दंडाची देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी झालेली असते.येथील तात्पुरती वाहतूक पोलीस चौकी मात्र दंड वसुलीचे ठिकाण बनल्याचे दिसून आल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे.चांदवड,पिंपळगाव,ओझर,आडगाव येथून दररोज हजारो नागरिक,अनेक रु ग्ण,नोकरदार,विद्यार्थी नाशिक शहरात येजा करत असताना त्यांना मोठ्याप्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. सदर वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून दंड वसुलीच्या नावाखालीच अनेक वेळा स्थानिक वाहतूक शाखेचे पोलीस झालेली कोंडी वाऱ्यावर सोडून देत असल्याने त्याचा फटका सामान्य माणसाला बसतोय. याबाबत स्थानिक नागरिकांनी तसेच नोकरदार,विध्यार्थी वर्गांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे सदर बाबीवर नाशिक शहर पोलीसांच्या संबंधितानी त्वरित लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक