उड्डाणपूलाच्या कामामुळे वाहतुक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 01:32 PM2020-01-18T13:32:36+5:302020-01-18T13:33:00+5:30

ओझर : सध्या मुंबई आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या संतापात दिवसेंदिवस भरच पडत आहे.

 Traffic congestion due to flyover work | उड्डाणपूलाच्या कामामुळे वाहतुक कोंडी

उड्डाणपूलाच्या कामामुळे वाहतुक कोंडी

Next

ओझर : सध्या मुंबई आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या संतापात दिवसेंदिवस भरच पडत आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाल्याचे बघण्यास मिळाले.
मुंबई आग्रा महामार्गावर ओझर ते नाशिक महामार्गाचे काही वर्षांपूर्वी सहापदरीकरण झाले होते. परंतु ओझर येथील खंडेराव मंदिर,गडाख कॉर्नर, लक्ष्मीनगर, जत्रा हॉटेल, हनुमान नगर, अमृतधाम येथे कायम होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हजारो वाहनधारक त्रस्त होते. परिणामी लेट का होईना येथे कामं मंजूर झाली व तीन उड्डाणपुलांचा समावेश करण्यात आला.सदर कामांना सुरवात झाल्यानंतर येथे सकाळ सायंकाळ होत असलेली वाहतूक कोंडी वाहधारकांना डोकेदुखी ठरत असताना ती सुरळीत करण्यासाठी अमृतधाम,हनुमान नगर येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.महत्वाचे म्हणजे त्यांच्या समवेत हंगामी कर्मचारी वाहनांच्या रांगा सुरळीत करीत असताना पोलीस मात्र त्या कोंडीत भर घालत असल्याचे चित्र रोजच बघण्यास मिळत असून एकरी करण्यात आलेल्या रस्त्यावर अवजड वाहनदेखील मोठ्याप्रमाणावर येजा करत असताना समांतर सर्व्हिस रोडचा उपाय देखील उपलब्ध असून केवळ त्याचा सुरळीत अवलंब केला जात नाही.
----------------------
पोलीस चौकीच बनली दंड वसूलीचे ठिकाण
जिथे क्र ॉसिंग आहे तिथे सर्वच प्रकारच्या गाड्यांना अडविले जाते व जोपर्यंत दंडाची देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी झालेली असते.येथील तात्पुरती वाहतूक पोलीस चौकी मात्र दंड वसुलीचे ठिकाण बनल्याचे दिसून आल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे.चांदवड,पिंपळगाव,ओझर,आडगाव येथून दररोज हजारो नागरिक,अनेक रु ग्ण,नोकरदार,विद्यार्थी नाशिक शहरात येजा करत असताना त्यांना मोठ्याप्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. सदर वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून दंड वसुलीच्या नावाखालीच अनेक वेळा स्थानिक वाहतूक शाखेचे पोलीस झालेली कोंडी वाऱ्यावर सोडून देत असल्याने त्याचा फटका सामान्य माणसाला बसतोय. याबाबत स्थानिक नागरिकांनी तसेच नोकरदार,विध्यार्थी वर्गांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे सदर बाबीवर नाशिक शहर पोलीसांच्या संबंधितानी त्वरित लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title:  Traffic congestion due to flyover work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक