शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकांच्या गर्दीने वाहतूक कोंडी

By admin | Updated: November 17, 2016 22:36 IST

बॅँकांच्या गर्दीने वाहतूक कोंडी

 मालेगाव : वाहनांमुळे आले परिसराला यात्रेचे स्वरूपमालेगाव कॅम्प : केंद्र शासनाने हजार व पाचशेच्या चलनी नोटा बंद केल्याने आपल्याजवळील नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी अनेक बॅँकामध्ये गर्दी केली आहे. गर्दीमुळे बॅँक परिसरातील भागात वाहतूक कोंडी होत आहे, तर नागरिकांच्या वाहनांमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना याचा मनस्ताप होत आहे. या गर्दीचे नियोजन करण्याची मागणी होत आहे.शहरात जुन्या नोटा बदलण्यासाठी शहरवासीयांची झुंबड उडाली आहे. दररोज बॅँकांमध्ये गर्दी वाढत आहे. शासनातर्फे पुन्हा पुन्हा यासाठी मुदतवाढ मिळत असल्याने नागरिक दररोज नवीन नवीन बॅँका नोटाबदल करण्यासाठी भटकंती करीत आहे. शहरातील मामलेदार गल्लीमधील सेंट्रल बॅँक, मामको बॅँक येथे सकाळपासून रांगा लागत आहे. येथे गर्दीमुळे गल्ली अरुंद पडत आहे तर या ठिकाणी मामलेदार गल्ली व नेहरू चौक येथे वाहतूक अडवण्यात आली आहे. बॅँकेच्या कामकाज वेळेत लोखंडी जाळ्या लावून मोठ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तसेच पेरी चौकातील मामको मुख्य कार्यालयात गर्दीमुळे किदवाई व मोहंमदअली रोडवर वाहतुकीचा परिणाम दिसून आला आहे.मुख्य टपाल कार्यालय, सटाणा रस्त्यावरील राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये गर्दीमुळे वाहतूक खोळंबा होताना दिसून येत आहे. शहरातील मुख्यत्वे स्टेट बॅँकेत दररोज हजारो नागरिकांची गर्दी होत आहे. या नागरिकांनी आणलेली वाहने बेशिस्तपणे रस्त्यांवर उभे केली, यामुळे नागरिकांची गर्दी व शेकडो वाहनांची गर्दी यामुळे स्टेट बॅँक चौक दिवसभर गर्दीत हरवला आहे. येथे नागरिक व वाहनांची गर्दी कमी करण्याचे नियोजन वेळोवेळी ढासळत आहे. यामुळे येथे वादाचे प्रसंग घडत आहेत. स्टेट बॅँक चौक मागील जैन मंदिर व इतर रहिवासी वस्तीतील नागरिकांना या गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या २४ तारखेपर्यंत नोटा बदल करण्यासाठी अवधी मिळत असल्याने वाहतुकीचा त्रास सर्वसामान्यांना व स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागेल, असे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)