शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

व्यापारी, उद्योजकांची ‘करकोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:43 IST

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेसमोर मिळकत करांमध्ये वाढ करण्यासंदर्भात ठेवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सत्ताधारी भाजपाच्या अडचणी वाढणार आहेत.

नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेसमोर मिळकत करांमध्ये वाढ करण्यासंदर्भात ठेवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सत्ताधारी भाजपाच्या अडचणी वाढणार आहेत. निवासी मिळकतीवर ३३ टक्के दरवाढीचा बोजा पडणार आहे. परंतु या दरवाढीचा सर्वाधिक फटका व्यापारी व कारखानदार-उद्योजक यांना बसणार आहे. अगोदरच नोटाबंदी, जीएसटीमुळे मंदीचे भोग भोगणाºया व्यापारी-उद्योजकांची महापालिकेने ‘करकोंडी’ करण्याचे ठरविल्याने सत्ताधारी भाजपाविरुद्ध हा वर्ग दुखावला जाण्याची चर्चा आता खुद्द भाजपातूनच होऊ लागली आहे. मंगळवारी (दि. २०) झालेल्या महासभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांवर जबर करवाढ लादणारा मिळकत कराचा प्रस्ताव ठेवला होता.  सदर करवाढ ही भाडेमूल्याऐवजी रेडीरेकनरनुसार भांडवली मूल्यावर आधारित करण्याचा हट्ट मुंढे यांनी सत्ताधारी भाजपापुढे धरला होता. परंतु त्यातील धोके लक्षात घेऊन महापौरांनी भाडेमूल्यावर आधारितच करवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, मनपा व शासन करांसह निवासी मिळकतींसाठी ८० टक्के, अनिवासी मिळकतींसाठी १२२ टक्के, तर औद्योगिक वापराच्या मिळकतींसाठी १३८ टक्के कर लागू केला जाणार आहे. यामध्ये करवाढीचा सर्वाधिक फटका हा व्यापारी आणि कारखानदार-उद्योजकांना बसणार आहे. व्यापारी आणि कारखानदार यांच्याकडून दुपटीपेक्षा जास्त कर वसूल केला जाणार आहे. शहरात नव्याने केलेल्या मिळकत सर्वेक्षणानुसार चार लाख ७६ हजार मिळकती आढळून आल्या असून, आणखी त्यात ४० ते ४५ हजार मिळकतींची भर पडण्याची शक्यता आहे. निवासी मिळकतींसाठी महापालिकेकडून भाडेमूल्य ५० पैसे दरमहा प्रतिचौरस फूट आकारले जाते. बिगर घरगुतीसाठी १.८० रुपये, तर औद्योगिकसाठी ४५ पैसे दर आहे. १९९९ पासून या दरामध्ये वाढझालेली नाही. एकदा भाडेमूल्य तथा करयोग्य मूल्य लागू केल्यानंतर त्यात बदल करता येत नसल्याने महापालिका प्रशासनाने करदरात वाढ केली आहे. मात्र, या दरवाढीची झळ सर्वात जास्त व्यापारी व उद्योजकांना बसणार आहे. त्यामुळे लहान गाळेधारकही अडचणीत येण्याची शक्यता आहे. परिणामी, भाजपाची व्होट बॅँक मानला जाणारा व्यापारी-उद्योजक हा घटक दुखावला जाण्याच्या भीतीने आता सत्ताधारी पक्षालाच ग्रासले आहे. त्यामुळे पक्षस्तरावर चलबिचल आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका