ठाणगाव-सिन्नर रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:55 IST2019-07-18T17:54:48+5:302019-07-18T17:55:01+5:30
ट्रॅक्टर खाली दबल्याने किरणबिन्नर यांचा मृत्यू

ठाणगाव-सिन्नर रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून एक ठार
ठाणगाव: -सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील ठाणगाव-सिन्नर रस्त्यावर देवीच्या खिंडीत घाट रस्त्याच्या एका वळणावर ट्रॅक्टर उलटून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. किरण नामदेव बिन्नर (वय १९) रा. हिवरे, ता. सिन्नर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ट्रॅक्टर कोण चालवत होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बाळकृष्ण सहाणे यांच्या मालकीचा हा ट्रॅक्टर बोरखिंड येथील वन विभागाच्या रोपवाटिकेतील रोपे घेण्यासाठी जात होता. ट्रॅक्टरमध्ये रोपे भरण्यासाठी ४-५ जण जात होते. देवीच्या खिंडीत एका वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला .यात ट्रॅक्टर खाली दबल्याने किरण यांचा मृत्यू झाला. ट्रॉलीत बसलेले ४-५जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिन्नर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.