शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

शेतक-यांचा विरोध डावलून अखेर टीपी स्कीमला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:54 PM

नाशिक- मखमलाबाद येथे सुमारे ३०६ हेक्टर क्षेत्रात साकारण्यात येणा-या ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी शेतक-यांनी केलेला विरोध आणि आक्रमक भूमिका घेतल्यानंतर देखील मंगळवारी (दि.२९) सत्तारूढ भाजपने नगरररचना योजनेच्या प्रारूपास प्रसिध्दी करण्यास अंतिम मान्यता दिली.

ठळक मुद्देस्मार्ट ‘ग्रीन फिल्ड’: उपमहापौरांचा विरोध एकाकी; महाविकास आघाडी आक्रमक

नाशिक- मखमलाबाद येथे सुमारे ३०६ हेक्टर क्षेत्रात साकारण्यात येणा-या ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी शेतक-यांनी केलेला विरोध आणि आक्रमक भूमिका घेतल्यानंतर देखील मंगळवारी (दि.२९) सत्तारूढ भाजपने नगरररचना योजनेच्या प्रारूपास प्रसिध्दी करण्यास अंतिम मान्यता दिली. भाजपच्या उपमहापौर भिकुबाई बागूल यांनीच विरोध करून करून घरचा आहेर दिला तर योजना भलेही मंजुर करा, परंतु चार ते पाच दिवस अभ्यासासाठी तहकूब ठेवा ही विरोधकांची सूचनाही महापौरांनी फेटाळून लावली. या योजनेत ५३ टक्के म्हणजे पन्नास टक्कयांपेक्षा अधिक जमिन मालकांचे समर्थन आहे तसेच शेतक-यांच्या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी शासनाने लवाद नियुक्त करण्याची सुविधा आहे आणि सध्या केवळ अंतिम प्रारूप घोषीत करण्यात येणार असल्याने हा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजुर करण्यात येत असल्याचे यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहिर केले.महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी गुरूमित बग्गा यांनी प्रारूप  आराखड्याच्या सादरीकरणाची मुदत संपुन गेल्यानंतर हा प्रस्ताव मांडण्यात आल्याच आक्षेप घेतला तर महासभेत या टीपी स्कीममध्ये ६० टक्के जागा शेतक-यांना तर चाळीस टक्के स्मार्ट सिटी कंपनीला देण्याचा ठराव करण्यात आला. मात्र, शासनाला पाठविताना ५५:४५ चा फॉर्मुला पाठविण्यात आला, असे अनेक आक्षेपाचे मुद्दे मांडले. तर सुधाकर बडगुजर यांनी भौगोलीक क्षेत्राफळातील गोंधळ सांगताना या ठिकाणी आरक्षण वगळण्यात आले तसेच नदीकाठी निळ्या रेषेतील बांधकामांना समाविष्ट करून लाभ देण्यात आला, ही सुपारी घेऊन कामे करण्यात आल्याचा आक्षेप घेतला. डॉ. हेमलता पाटील यांनी हा शेतक-यांना उध्वस्त करणारा प्रस्ताव असल्याने फेटाळ्याची मागणी केली. विलास शिंदे यांनी शेतक-यांवर शिवसेना अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले. चर्चेत गजानन शेलार, दीक्षा लोंढे,संभाजी मोरूस्कर, जगदीश पाटील, सतीश सोनवणे यांनी सहभाग घेतला.बोधले यांच्या स्पष्टीकरणाने गोंधळस्मार्ट सिटीच्या नगररचनाकार कांचन बोधले यांनी गुरूमित बग्गा यांच्या आक्षेपांचे स्पष्टीकरण दिल्याने गोंधळ उडाला. बग्गा यांनी त्यास आक्षेप घेतला. त्या मुळातच महापालिकेच्या सेवेत नाहीत, त्यांना सभागृहात बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगून त्यांनी इतिवृत्तातून बोधले यांचे म्हणणे वगळण्याची मागणी केली.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGreen Planetग्रीन प्लॅनेट