‘रामशेज’वरील बुरुजांची डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:14 AM2019-11-12T01:14:30+5:302019-11-12T01:15:08+5:30

रामशेज येथील किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या श्रमदानातून किल्ल्यावरील बुरुजांची तसेच नैसर्गिक बारवांची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. किल्ल्यावर डागडुजी करताना कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छताही केली.

 The towers of the towers on the 'Ramshes' | ‘रामशेज’वरील बुरुजांची डागडुजी

‘रामशेज’वरील बुरुजांची डागडुजी

Next

नाशिक : रामशेज येथील किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या श्रमदानातून किल्ल्यावरील बुरुजांची तसेच नैसर्गिक बारवांची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. किल्ल्यावर डागडुजी करताना कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छताही केली.
गेल्या दहा वर्षांपासून सह्याद्री पर्वतरांगा सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरी किल्ले, प्राचीन घाट, मंदिरे, समाध्या, प्राचीन बारवांच्या संवर्धनासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे कार्यकर्ते श्रमदान करीत आहेत. रामशेजच्या प्रत्येक टाके निर्मळ, स्वच्छ व्हावे, वस्तूंचा परिसर व वास्तू शिवदुर्गभक्तांना बघता याव्यात यासाठी रविवारी सातत्यपूर्ण मोहिमा राबविल्या जातात. त्याचाच भाग म्हणून संस्थेच्या दुर्गसंवर्धन मोहिमेत दिवसभर श्रमदान करण्यात आले.
या मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक, श्रमदान समितीचे भाऊसाहेब चव्हाणके, सल्लागार राजेंद्र चव्हाणके, कृष्णकांत विसपुते, संदीप कांदे, प्रा. सोमनाथ मुठाळ, पवन माळवे, नीलेश शिंदे, सोमनाथ घोलप, प्रवीण भेरे, गोकुळ शिंदे, कार्तिक होळकर, क्रीडाशिक्षक, दीपक लभडे, दांडेकर तालीम पहिलवान विकास ससाणे, धनंजय चोथे, किरण धुमाळ, सागर सोनवणे, अनिकेत माळी, हेमंत सोनवणे, अक्षय सोनवणे, चंद्रकांत देवरे, विकी लभडे, मयूर धात्रक, अभिषेक बोडके, अनिकेत माळी, सुयशा चव्हाणके, रुद्र चव्हाणके, सलीम सय्यद, उपस्थित होते.
असे केले श्रमदान
एकूणच किल्ल्याचा परिसर स्वच्छ राहावा, वास्तू नीट बघता याव्यात, टाके स्वच्छ निर्मल राहावे यासाठी विशेषत्वाने श्रमदान केले जाते, दिवसभर केलेल्या श्रमदानातून मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूचा पडझड झालेल्या बुरुजावर पडलेले दगड बुरुजावर बसवले, तसेच बुरुजांच्या पायावर मातीचा भराव रचला. गोमुखींद्वाराजवळच्या चुन्याचा घाण्यातील काटेरी गवत कापून त्यातील माती व खडी काढून चुन्याचा घाणा, गोमुखी दरवाजात साचलेला गाळ, कचरा, दगडे बाहेर काढण्यात आली.

Web Title:  The towers of the towers on the 'Ramshes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.