विवाहचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 18:38 IST2020-05-12T18:36:10+5:302020-05-12T18:38:40+5:30

सेवादास याने तिला सुरुवातील प्रेमाची फूस दाखवून विवाहचे आमीष दिले. नोव्हेंबर २०१९पासून दिला पुणे येथील दौंड या राहत्या गावातून नाशिकमध्ये पळवून आणले.

Torture of a minor girl by showing the lure of marriage | विवाहचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

विवाहचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देसेवादासविरूध्द बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा नोंदविला तिच्या इच्छेविरूध्द वारंवार लैंगिक संबध प्रस्थापित

नाशिक : विवाहचे आमीष दाखवून एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचा बनाव करत संशयित नराधम सेवादास पुंजाजी गवारे ( २४, रा. केनवड, ता.रिसोड, जि. वाशिम) याने तिच्या इच्छेविरूध्द वारंवार लैंगिक संबध प्रस्थापित करत दोनवेळा तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सेवादासविरूध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे, सेवादास याने तिला सुरुवातील प्रेमाची फूस दाखवून विवाहचे आमीष दिले. नोव्हेंबर २०१९पासून दिला पुणे येथील दौंड या राहत्या गावातून नाशिकमध्ये पळवून आणले. त्याने दौंड येथे राहत्या घरात तसेच नाशिकला तिडके कॉलनी परिसरातील एका बंगल्यावर वॉचमन म्हणून राहत असलेल्या खोलीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे पिडितेने म्हटले आहे. तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन दोनवेळा गर्भपात करण्यास भाग पाडत मारहाणदेखील केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संशयित सेवादासविरूध्द बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा नोंदविला आहे.
 

Web Title: Torture of a minor girl by showing the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.