टोमॅटो उत्पादकांचे पैसे न मिळाल्याने धरणे आंदोलन, कांदा लिलाव पाडले बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 11:47 IST2025-03-11T11:46:48+5:302025-03-11T11:47:17+5:30
टोमॅटो विकून चार महिने झाले मात्र आडत आणि व्यापाऱ्यांकडून तसेच बाजार समिती प्रशासनाकडून देखील दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगाव बाजार समितीच्या गेटवरच धरणे देत आंदोलन सुरू केले आहे.

टोमॅटो उत्पादकांचे पैसे न मिळाल्याने धरणे आंदोलन, कांदा लिलाव पाडले बंद
गणेश शेवरे
पिंपळगाव बसवंत - टोमॅटो विकून चार महिने झाले मात्र आडत आणि व्यापाऱ्यांकडून तसेच बाजार समिती प्रशासनाकडून देखील दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगाव बाजार समितीच्या गेटवरच धरणे देत आंदोलन सुरू केले आहे. यावेळी बाजार समितीची दोन्ही गेट बंद करत कांदा लिलाव देखील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये गुरुकृपा या आडत द्वारे शेतकऱ्यांचे टोमॅटो खरेदी केले होते मात्र टोमॅटो खरेदी करून सदर अडत्याने आजपर्यंत शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवले.
वेळोवेळी शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन, बाजार समिती प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटवरच धरणे देत आंदोलन सुरू केले आहे यावेळी कांदा लिलाव देखील बंद पाडले आहे.
बाजार समितीच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त...
जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.