लासलगाव बाजार समितीत उद्यापासून टोमॅटो लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 22:28 IST2021-07-31T22:28:13+5:302021-07-31T22:28:39+5:30
लासलगाव : येथील बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर सोमवारपासून (दि.२) टोमॅटो लिलावास सुरुवात होणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

लासलगाव बाजार समितीत उद्यापासून टोमॅटो लिलाव
लासलगाव : येथील बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर सोमवारपासून (दि.२) टोमॅटो लिलावास सुरुवात होणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.
लासलगावसह परीसरातील निफाड, चांदवड, नांदगाव, येवला, सिन्नरसह कोपरगाव तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो शेतमालाची लागवड केली असल्याने त्यांना माल विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे गेल्या २५ वर्षांपासून लासलगाव मुख्य बाजार आवारावर टोमॅटो लिलावास सुरुवात करण्यात आली आहे.
त्यानुसार यावर्षी सोमवारी (दि.२) भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवार लासलगाव येथे टोमॅटो लिलाव सुरू होणार आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांनी आपला टोमॅटो शेतमाल मोठा (सुपर/एक नंबर), मध्यम, लहान (गोल्टी), बदला (बिलबिला, तडकलेला, खरचटलेला) अशी योग्य प्रतवारी करून २० किलोच्या क्रेटमध्ये विक्रीस आणावा.
लिलावानंतर लगेचच इलेक्ट्रॉनिक काट्यावर चोख वजन करून रोख चुकवती देण्यात येईल. तसेच टोमॅटो खरेदीस इच्छुक असणाऱ्या नवीन व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी, शर्तींची पूर्तता केल्यास त्यांना तत्काळ परवाना देऊन प्रतवारी व पॅकिंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.