टोल वसुलीच्या वादातून टोल कर्मचाऱ्यास ट्रकचालकाने चिरडलं, कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 12:06 IST2017-12-15T11:19:26+5:302017-12-15T12:06:36+5:30
नाशिकहून मुंबईला कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाने टोल वसूल करणाऱ्या कर्मचारी योगेश दत्तात्रय गोवर्धने याला चिरडलं.

टोल वसुलीच्या वादातून टोल कर्मचाऱ्यास ट्रकचालकाने चिरडलं, कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
घोटी - नाशिकहून मुंबईला कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाने टोल वसूल करणाऱ्या कर्मचारी योगेश दत्तात्रय गोवर्धने याला चिरडलं. टोल आकारणीवरून वाद झाल्याने कर्मचाऱ्याला चिरडलं असल्याची माहिती समोर येेते आहे. यात या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक घेऊन फरार झालेल्या ट्रकचालकास टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून खर्डी येथे पकडले व त्यास पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
दरम्यान, आज सकाळी या युवकाचे घोटी येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह घोटी टोल नाक्यावर आणला.जोपर्यंत टोल प्रशासनाचे जबाबदार अधिकारी येत नाही. तोपर्यंत मृतदेह न हलविण्याचा निर्णय टोल कर्मचाऱ्यांनी घेतला. तसेच काम बंद आंदोलन ही सुरू केले.
दरम्यान, घटना घडून बारा तास उलटूनही टोल प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी येत नसल्याने टोल कर्मचारी संतप्त झाले.त्यांनी साडेदहा वाजता उशिरा येणाऱ्या व्यवस्थापक अनिरुद्ध सिंग याला जाब विचारीत मारहाण केली.