शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यासाठी तूरडाळीचा आज फैसला

By admin | Updated: July 30, 2016 00:51 IST

नाशिक जिल्ह्यासाठी तूरडाळीचा आज फैसला

नाशिक : रेशन दुकानावर स्वस्त दरात गोरगरिबांना तूरडाळ उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्याला लागणाऱ्या सुमारे पावणेपाच हजार क्ंिवटल तूरडाळ पुरविणारा ठेकेदार शनिवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत ठरणार असून, परवडणारा दर व वाहतूक खर्चाचा विचार करता, ठेकेदाराला १२० रुपये दराने डाळ देणे शक्य झाल्यास आॅगस्ट महिन्यात सणासुदीला गोरगरिबांना वरण-भाताचा बेत करणे शक्य होणार आहे. तूरडाळीचे खुल्या बाजारात १८० ते २०० रुपये दर झाल्यामुळे वरणाचा बेत सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेला असून, गोरगरिबांनी तर तूरडाळीकडे कधीच पाठ फिरविल्यामुळे राज्य सरकारवर सर्वत्र टीका होऊ लागली आहे. त्यावर उपाय म्हणून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना रेशनवर स्वस्त दरात तूरडाळ देण्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील अंत्योदय योजनेचे लाभार्थी व दारिद्र्य रेषेखालील पिवळी शिधापत्रिकाप्राप्त लाभेच्छुकांची माहिती गोळा करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात चार लाख ८७ हजार ९४७ इतके लाभेच्छुक असल्याची माहिती यापूर्वीच पुरवठा विभागाने शासनाला कळविली असून, रेशनवर तूरडाळ पुरवठा खात्याने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत असलेल्या ठेकेदारांकरवी पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शनिवारी मुंबईत नाशिक जिल्ह्यासाठी ठेकेदार निश्चितीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तूरडाळ थेट जिल्ह्यातील १७ गुदामांपर्यंत पोहोचविण्यासाठी येणारा खर्च धरून १२० रुपये दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वाहतूक ठेकेदारावर सोपविण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी चार हजार आठशे क्ंिवटल इतकी तूरडाळ लागणार असून, प्रति कार्डधारकास महिन्याकाठी एक किलो इतकीच डाळ देण्यात येणार आहे. शनिवारी होणाऱ्या लिलाव पद्धतीत ठेकेदार निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष रेशन दुकानापर्यंत तूरडाळ पोहोचण्यास पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्यातील सणासुदीच्या दिवसात गोरगरिबांना तूरडाळीच्या वरणाचा बेत आखणे शक्य आहे. (प्रतिनिधी)