तिसगाव धरण ओहर फ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:54 IST2020-09-20T22:56:12+5:302020-09-21T00:54:30+5:30
खेडगाव : मागील आठवड्या पासून सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील तिसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले.

तिसगाव धरण ओहर फ्लो
खेडगाव : मागील आठवड्या पासून सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील तिसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले. त्यामुळे परिसरातील शेतकरी समाधानी झाला आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून होणारा चांगला पाऊस त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत नाही. मागील काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस त्यामुळे होणारा द्राक्ष छाटणी हंगाम उशीर होत आहे. तसेच ज्यांनी छाटणी यापूर्वी केलेली आहे, त्या बागांना या पावसामुळे नुकसान होणार आहे. टोमॅटो सारख्या पिक मका सोयाबीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. त्यामुळे एका बाजूने धरण भरल्याचा आनंद तर दुसरीकडे आता होणाऱ्या पावसाने नुकसान या द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. (२० खेडगाव १/२)