कर्जबाजारीला कंटाळून युवा शेतकऱ्याने संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 09:58 PM2020-06-30T21:58:02+5:302020-06-30T22:38:18+5:30

वणी : येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर राजाराम जाधव (२२, रा. कोशिंबे, ता. दिंडोरी) यांने त्याच्या राहत्या घराजवळील शेतात कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

Tired of debt, the young farmer ended his life | कर्जबाजारीला कंटाळून युवा शेतकऱ्याने संपविले जीवन

कर्जबाजारीला कंटाळून युवा शेतकऱ्याने संपविले जीवन

Next
ठळक मुद्देकर्जबाजारीला कंटाळून युवा शेतकºयाने संपविले जीवन

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर राजाराम जाधव (२२, रा. कोशिंबे, ता. दिंडोरी) यांने त्याच्या राहत्या घराजवळील शेतात कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.
त्याचे वडील राजाराम बाळासाहेब जाधव (४८) यांचा अपघात होऊन पाय मोडल्याने ते घरातच असून, आई सुनंदा जाधव (४४) वाताच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर याच्यावर कमी वयात मोठी जबाबदारी पडली. परिणामी मानसिकता ढासळल्याने त्याने विष पिऊन आत्महत्या केली. सुमारे साडेबारा लाख रु पये कर्ज असून, ते कसे फेडायचे असा प्रश्न सतत असायचा. त्या बरोबर घराची जबाबदारी आणि लहान बहीणच लग्नाची असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असावा, असे त्याच्या कुटुंबीयांकडून समजते. या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Web Title: Tired of debt, the young farmer ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.