शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

मिरवणूक रद्द: यंदा बाप्पाची मुर्ती तीन फुटांपेक्षा मोठी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 7:00 PM

येत्या २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे; मात्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला कुठल्याहीप्रकारची मिरवणूक काढण्यात येणार नाही, असा निर्णय पोलीस आयुक्तालयात आयुक्त विश्वास नांगरे पाटील व महानगर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री सहायता निधीला देणार मदतीचा हातरक्तदान शिबिरांसह आरोग्य तपासणी अन् जनजागृती

नाशिक : देशासह संपुर्ण राज्यावर यंदा कोरोना या महामारीचे भयावह संकट आले आहे. अवघा देश या संकटाशी झुंज देत आहेत. पहिल्या लॉकडाऊनपासून सर्व प्रार्थनास्थळे व सण-उत्सवांचे सार्वजनिक स्वरूपही रद्द केले गेले आहे. यामुळे यावर्षी गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. तसेच गणरायाच्या प्रतिष्ठापना व अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरसुध्दा विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय निर्णय नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी शहर पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेतला गेला.

कोरोना आजारामुळे राज्याची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. तसेच कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण गरजेचे आहे. यामुळे येत्या २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे; मात्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला कुठल्याहीप्रकारची मिरवणूक काढण्यात येणार नाही, असा निर्णय पोलीस आयुक्तालयात आयुक्त विश्वास नांगरे पाटील व महानगर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी (दि.६) सकाळी आयुक्तालयाच्या सभागृहात सर्व खबरादारी घेत महानगर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती.या बैठकीला उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, विजय खरात यांच्यासह इतर अधिकारी तसेच नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, विनायक पांडे, प्रथमेश गिते, शंकर बर्वे आदि पदाधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव मित्र मंडळांनी जास्तीत जास्त तीन फूट उंचीची गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावर्षी मिरवणुक न काढण्याचा, गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारे डिजे, ध्वनीक्षेपकाचा वापर पुर्णपणे टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. पदाधिका-यांच्या या निर्णयाचे नांगरे पाटील यांनी यावेळी स्वागत करत पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगला कृती आराखडा तसेच आचारसंहीता तयार करावी. नाशिक शहराचा आदर्श संपुर्ण राज्यापुढे ठेवावा, असेही ते यावेळी म्हणाले.
रक्तदान शिबिरांसह आरोग्य तपासणी अन् जनजागृतीगणेशोत्सवादरम्यान विविध मंडळांकडून रक्तदान शिबीरे, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजनावर भर दिला जाणार आहे. तसेच कोरोनाबाबत समाजात जनजागृती करत सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले. मंडळाच्या सभासदांच्या देणगीतून मुख्यमंत्री सहायता निधीला मदतीचा हात देण्याची तयारीही यावेळी दर्शविण्यात आली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयGanesh Mahotsavगणेशोत्सवCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस