पिंपळगाव बसवंत शहरात लाकडाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 11:43 PM2021-04-12T23:43:38+5:302021-04-13T00:21:29+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता मृत्यूचे प्रमाणही अचानक वाढले गेल्याने शहर तसेच परीसरात आता कोरोनाची भीती वाढतच आहे. येथे केवळ दोन अमरधाम शहरात असून मुख्य अमरधाम येथे तीन अंत्यविधी एका वेळेस होतील असी व्यवस्था आहे. आता सदरची जागाही कमी पडत आहे एकाच दिवसात सात अंत्यसंस्कार केले जात असल्याने ही जागा अपुरी पडू लागली आहे.

Timber shortage in Pimpalgaon Baswant city | पिंपळगाव बसवंत शहरात लाकडाचा तुटवडा

पिंपळगाव बसवंत शहरात लाकडाचा तुटवडा

Next
ठळक मुद्दे मजूरच मिळत नसल्यामुळे आता लाकडांचा तुटवडा

पिंपळगाव बसवंत : परिसरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता मृत्यूचे प्रमाणही अचानक वाढले गेल्याने शहर तसेच परीसरात आता कोरोनाची भीती वाढतच आहे. येथे केवळ दोन अमरधाम शहरात असून मुख्य अमरधाम येथे तीन अंत्यविधी एका वेळेस होतील असी व्यवस्था आहे. आता सदरची जागाही कमी पडत आहे एकाच दिवसात सात अंत्यसंस्कार केले जात असल्याने ही जागा अपुरी पडू लागली आहे.

त्यामुळे आता अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडांची कमतरता भासू लागली असून शहरातील काही प्रमुख लाकूड विक्रेत्यांकडे केवळ मर्यादित साठा उपलब्ध असल्याने परिस्थिती बिघडू लागली आहे. लाकूड तोडायला मजूरच मिळत नसल्यामुळे आता लाकडांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
आजपर्यंत निफाड तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता बाधित रुग्णसंख्या ९३५४ असून उपचार घेत असलेले २२७२ आहे तर आतापर्यंत २४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील काही दिवसांपासून पूर्वी नाशिक येथे कोरोनाबाधित मृत्यू झाल्यास नाशिकच्याच अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते; परंतु नाशिकची परिस्थिती भयानक झाल्याने कोरोनाचे मृतदेह आता आपापल्या गावी नेऊन जाऊन अंत्यसंस्कार करण्यात येत असून पिंपळगाव बसवंत परिसरातील मृतदेह वाढल्याने आता या पुढे लाकडांच्या टंचाईला सामोरे जावे लागणार, अशी परिस्थिती होऊ लागली आहे.

अनेक वर्षांपासून लाकूड तोडण्याचे काम करणारे मजूर आता येथे येण्यास तयार नाहीत. सध्या दोन, तीन दिवस पुरेल इतकाच लाकूडसाठा आहे.
- योगेश दळवी, लाकूड विक्रेता, पिंपळगाव बसवंत. 

Web Title: Timber shortage in Pimpalgaon Baswant city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.