शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

टिळकवाडी सिग्नल पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST

प्रेसगेट समोर सेवानिवृत्तांचे पोस्टर्स नाशिक : नाशिकरोड येथील दोन्ही प्रेससमोर सेवानिवृत्त झालेल्यांचे मोठ मोठे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. ...

प्रेसगेट समोर सेवानिवृत्तांचे पोस्टर्स

नाशिक : नाशिकरोड येथील दोन्ही प्रेससमोर सेवानिवृत्त झालेल्यांचे मोठ मोठे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. गेल्या ३१जानेवारीला सेवानिवृत्त झालेल्यांची संख्या मोठी असल्याने मित्र परिवाराकडून प्रेसच्या मार्गावर सेवानिवृत्तीचे फलक लावले आहेत. एकापेक्षा अधिक आणि भव्य फलक लावण्यात आले आहेत.

बसस्थानकांमध्ये खासगी वाहनांचे पार्किंग

नाशिक : शहरातील सीबीएस बसस्थानक येथे खासगी वाहनांचे पार्किंग वाढले आहे. जुना सीबीएस परिसर मोठा असून जवळच असलेल्या न्यायालयीन कामकाजासाठी आलेले अनेक नागरिक बसस्थानकाच्या आवारात वाहने उभी करीत आहेत. अनेक प्रवासी देखील आवारात वाहने उभी करून बसने प्रवास करीत असतात.

स्मार्ट पदपथावर दुचाकीचे वाहनतळ

नाशिक : शहरातील स्मार्ट रोडच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या पदपथावर दुचाकीचे वाहनतळ तयार झाले आहे. न्यायालय आवारात खासगी वाहनांना बंदी असल्याने न्यायायलीन कामकाजासाठी येणारे अनेक लोक पदपथावरच आपली दुचाकी वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनांना वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

तहसील कार्यालयांमध्ये वाढली गर्दी

नाशिक : जमीन तसेच परवाने आदी कामांसाठी तहसील कार्यालयामध्ये अभ्यागतांची गर्दी वाढू लागली आहे. त्याबरोबरच येथील तलाठी कार्यालयांमध्ये सातबारा, शेतसारा भरण्यासाठी देखील नाशिककरांची गर्दी होऊ लागली आहे. शासकीय कामकाजाला गती मिळत असल्याचे दैनंदिन गर्दीवरून दिसून येत आहे.

तपोवन रस्त्यावरील भाजीबाजार वाढला

नाशिक : तपोवन मार्गावरील नासर्डी पूल ते शंकरनगर चौक या मार्गावर भरणाऱ्या भाजीबाजारात वाढ झालेली आहे. या मार्गावर रस्त्याच्या एका बाजूला काही विक्रेते भाजी विक्रीचा व्यवसाय करीत होते. कोरोनाच्या काळात यात वाढ होत गेली. आता येथील बाजार दिवसेंदिवस वाढतच आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळभाज्यांची दुकाने थाटली आहेत.

पेट्रोल दरवाढीने वाढले रिक्षाभाडे

नाशिक : पेट्रोलची दरवाढ झाल्यामुळे रिक्षाचालकांनीदेखील प्रवासी भाड्यात वाढ केली असल्याचे दिसते. शहर बसेसची अपुरी संख्या असल्याने प्रवाशांना स्वत:ची वाहने किंवा खासगी प्रवासी साधनांचा वापर करावा लागतो. पेट्रोलची दरवाढ झाल्यामुळे रिक्षाचालकांनी देखील आपल्या प्रवासी दरात वाढ केल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.

पालेभाज्यांचे दर झाले कमी

नाशिक : अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांचे वाढलेले दर काही प्रमाणात नियंत्रित झाल्याचे दिसते. मेथी, शेपू या भाज्यांची जुडी दहा रुपयांचा मिळू लागली असल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे. अन्य भाजीपालादेखील स्वस्त झाल्याने खरेदी देखील वाढली आहे. गाजर, मका, टोमॅटो यांचे दर देखील कमी झाल्याचे बाजारभावावरून दिसून येत आहे.