अग्निशामक दलाच्या जवानांना बांधल्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 19:12 IST2021-08-22T19:07:00+5:302021-08-22T19:12:50+5:30

दाभाडी : मालेगाव राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने रक्षाबंधनानिमित्त मालेगाव महापालिका अग्निशामक दलाच्या सर्व जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन दिन साजरा करण्यात आला.

Tied to the fire brigade | अग्निशामक दलाच्या जवानांना बांधल्या राख्या

अग्निशामक दलाच्या जवानांना बांधल्या राख्या

ठळक मुद्दे राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने मालेगाव महापालिकेतील ४१ अग्निशामक दलाच्या जवानांना राख्या बांधल्या.

दाभाडी : मालेगाव राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने रक्षाबंधनानिमित्त मालेगाव महापालिका अग्निशामक दलाच्या सर्व जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन दिन साजरा करण्यात आला.

खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने मालेगाव महापालिकेतील ४१ अग्निशामक दलाच्या जवानांना राख्या बांधल्या. यावेळी अग्निशामक दलाचे अधिकारी संजय पवार यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. अग्निशामक दलाचे काम फक्त आग आटोक्यात आणणे असे आम्हांला वाटायचे. पण जेव्हा अग्निशामक दलाच्या जवानांनी आम्हांला काही घटना सांगितल्या, त्या अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या, असे तालुका अध्यक्षा हेमलता मानकर यांनी सांगितले.
यावेळी मालेगाव शहर अध्यक्षा सुचित्रा सोनवणे, वैशाली मोरे, प्रतिभा घुसर, तेजस्विनी गवळी आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Web Title: Tied to the fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.