मिरचीची पूड फेकून बॅग लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 00:02 IST2020-03-10T00:02:01+5:302020-03-10T00:02:22+5:30
मालेगाव : बाराबंगला भागातील मोतीभवनजवळ राहणारे अल्पबचत प्रतिनिधी विशाल विजय कबाड (३४) यांच्या राहत्या घरासमोर तीन अनोळखी चोरट्यांपैकी एकाने फिर्यादीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून २५ हजारांची रोकड, पिग्मी यंत्र असा एकूण ३५ हजार १०० रूपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून पोबारा केला.

मिरचीची पूड फेकून बॅग लंपास
मालेगाव : बाराबंगला भागातील मोतीभवनजवळ राहणारे अल्पबचत प्रतिनिधी विशाल विजय कबाड (३४) यांच्या राहत्या घरासमोर तीन अनोळखी चोरट्यांपैकी एकाने फिर्यादीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून २५ हजारांची रोकड, पिग्मी यंत्र असा एकूण ३५ हजार १०० रूपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून पोबारा केला. शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी विशाल कबाड हे मालेगाव मर्चंट बँक व गोविंद दुसाने पतसंस्थेची दिवसभराची अल्पबचतीची रक्कम जमा करुन घरी बाराबंगला येथे कम्पाऊंडचे गेट उघडत असताना एक इसम तोंडाला चॉकलेटी रूमाल बांधलेला फिर्यादीजवळ आला. त्याने फिर्यादीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून हातातील पैशाची बॅग बळजबरीने हिसकावून जवळच उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मोपेडवर बसलेल्या दोन इसमांबरोबर पळून गेला.