शहरातून तीन दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:01 IST2018-11-24T18:00:14+5:302018-11-24T18:01:02+5:30
नाशिक : शहरात दुचाकीचोरीचे सत्र असून, पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतून एक तर उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़

शहरातून तीन दुचाकींची चोरी
नाशिक : शहरात दुचाकीचोरीचे सत्र असून, पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतून एक तर उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ पंचवटीतील मुठेगल्लीतील रहिवासी सुरेश कासलीवाल यांची २० हजार रुपये किमतीची अॅक्टिवा (एमएच १५, सीएच ८३६७) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिकरोड बिगबाजारमागील प्राइड होममधील रहिवासी सुनील मेसी यांची डिवो मोपेड (एमएच १५, डीजे ९१२०) चोरट्यांनी त्यांच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दसक येथील वैशालीनगरमधील रहिवासी सुनील पगारे यांची काळ्या रंगाची बुलेट दुचाकी (एमएच १५, एफवाय ४८६५) चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
घरफोडीत लॅपटॉपची चोरी
नाशिक : सिडकोतील महाराणा प्रताप चौकातील रहिवासी संतोषकुमार बाफणा यांच्या गुदामाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़