नाशिक: दुष्काळाच्या शापापासून मुक्त होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील तीन गावांमधील ग्रामस्थ श्रमदानासाठी एकत्र आले आहेत. ग्रामस्थांनी दुष्काळाचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. आता रडायचं नाही, तर लढायचं, असा निर्धार करत आबालवृद्ध आणि महिला, मुलांसह साऱ्यांनीच हातात कुदळ, फावडं घेत दुष्काळाला आव्हान दिलं आहे. गावाला पाणीदार करण्याची शपथ घेत या ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. पाणी फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित वॉटर कप स्पर्धेसाठी हे गाव सज्ज होत आहे.
सिन्नर तालुक्यात तुफान आलंय या!; ग्रामस्थांचं दुष्काळाला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 17:31 IST