शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धमकावणारे तिघे अटकेत

By admin | Updated: March 4, 2017 01:03 IST

नांदगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे व त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बातमी प्रसिद्ध करू, अशी धमकी देणाऱ्या तिघाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 नांदगाव : येथील ग्रामीण  रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे व त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना साप्ताहिकात बातमी प्रसिद्ध करू, अशी धमकी देणाऱ्या तिघा संशयितांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. या तिघा संशयित पत्रकारांविरु ध्द खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा आणणे व जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक विघे, प्रदीप चव्हाण, गणेश सोनवणे या तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान डॉक्टर रोहन बोरसे व त्यांच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे वृत्त कळताच आज सांयकाळी पोलीस स्टेशनच्या आवारात शहरातील डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह विविध पक्ष संघटनाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तिघा संशयितांनी ग्रामीण रु ग्णालयात जावून तेथील डॉक्टर्स कर्मचाऱ्यांना बातमी प्रसिद्ध करण्याच्या नावाखाली धमकावले यापूर्वी असेच प्रकार घडले असल्याने आज डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा संयम सुटला व त्यांनी पोलिसांत तक्र ार दाखल करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर बोरसे यांनी या घटनेची जिल्हा शल्यचिकित्सकांना फोनवरून माहिती दिली. वारंवार धमकावण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने आमची नांदगाव ग्रामीण रुग्णालयातून बदली करा अशी विनंती जिल्हा शल्य चिकित्सकांना करण्यात आली. यानंतर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी मग पोलीस स्टेशनला धाव घेतली व झालेल्या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अरु ण निकम यांना दिली. एव्हाना शहर व तालुक्यातील नागरिकांनी पोलीस स्टेशनच्या दिशेने धाव घेऊन गर्दी केली. या कालावधीत संशयितांच्या कुटुंबातल्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याप्रकरणी शनिवारी नांदगाव बंदची हाक देण्यात आली आहे. (वार्ताहर)