शहरातील तीन घटनांमध्ये तिघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 18:08 IST2018-11-17T18:07:28+5:302018-11-17T18:08:01+5:30
नाशिक : आडगाव शिवारातील कोणार्कनगरमधील पंचवीस वर्षीय तरुणाने घरातील स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास घडली़ अमर ऊर्फ अमित बळीराम लोमटे ( रा. रो-हाऊस नंबर ४३, लोकधारा सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. खासगी ठेकेदारीचे काम करणाऱ्या अमर लोमटे याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

दुसरी घटना सातपूर येथील स्वारबाबानगरमध्ये शुक्रवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास घडली़ धम्म चौकातील रहिवासी भीमराव शंकर उबाळे (३७, रा. वरीलप्रमाणे) यांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, सापतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़
तिसरी घटना पंचवटीतील फुलेनगरमध्ये घडली़ युवराज विजय बोराडे (२८, रा. तीनपुतळ्याजवळ, फुलेनगर) या युवकाने राहत्या घरी विषारी औषध सेवन केले़ ही बाब लक्षात येताच त्याचे वडील विजय बोराडे यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, पंचवटी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़