शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

तीन विभागांत भाजपाचे होणार प्रभाग सभापती

By admin | Updated: March 4, 2017 01:17 IST

नाशिक : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी विभागांमधील काही प्रभागांची फेररचना करण्यात आल्याने राजकीय समीकरणेही बदलणार असून, भाजपाकडे तीन विभागांचे प्रभाग सभापतिपद जाणार आहे

 नाशिक : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी विभागांमधील काही प्रभागांची फेररचना करण्यात आल्याने राजकीय समीकरणेही बदलणार असून, भाजपाकडे तीन विभागांचे प्रभाग सभापतिपद जाणार आहे. नाशिक पश्चिम विभागात कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे आघाडीला, तर सिडको विभागात शिवसेनेकडे बहुमत असल्याने त्याठिकाणी त्यांचाच प्रभाग सभापती बसणार, हे स्पष्ट आहे. सातपूर विभागात मात्र मनसे व रिपाइंच्या भूमिकेवर सभापतिपद अवलंबून असणार आहे.महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी विभागातील काही प्रभागांची फेररचना करण्यात आली आहे. त्यात नाशिक पूर्व मधील प्रभाग क्रमांक १३ हा पश्चिम विभागाला, नाशिक पश्चिममधील प्रभाग २४ हा सिडकोला, तर सिडकोतील प्रभाग २६ हा सातपूर विभागाला जोडण्यात आला आहे. या फेररचनेमुळे प्रभाग समित्यांवरील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. पंचवटी विभागात १ ते ६ प्रभाग आहेत. याठिकाणी २४ पैकी भाजपा - १९, शिवसेना - १, मनसे - २ आणि अपक्ष - २ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाचे निर्विवाद बहुमत असल्याने याठिकाणी भाजपाचाच प्रभाग सभापती विराजमान होईल. नाशिक पश्चिममध्ये प्रभाग ७, १२ आणि १३ असे तीन प्रभाग आहेत. याठिकाणी १२ पैकी भाजपा ५, शिवसेना - १, राष्ट्रवादी - १, कॉँग्रेस - ४, तर मनसे-१ असे पक्षीय बलाबल आहे. येथे कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसेने निवडणूकपूर्व आघाडी केली असल्याने त्यांचाच प्रभाग सभापती होईल. सेनेने भाजपाला साथ दिली तर समसमान बल होऊन चिठ्ठी पद्धतीने सभापतिपदाची सोडत काढावी लागणार आहे. सिडको विभागात प्रभाग २४, २५, २७, २८, २९ आणि ३१ याप्रमाणे सहा प्रभाग आहेत. याठिकाणी २४ पैकी भाजपा-९, शिवसेना-१४, राष्ट्रवादी-१ असे पक्षीय बलाबल आहे. येथे शिवसेनेचे पूर्ण बहुमत असल्याने सेनेचाच प्रभाग सभापती विराजमान होणार आहे. नाशिक पूर्व विभागात प्रभाग १४, १५, १६, २३ आणि ३० असे पाच प्रभाग आहेत. याठिकाणी भाजपा-१२, कॉँग्रेस-२, राष्ट्रवादी-४ आणि अपक्ष-१ असे बलाबल आहे. याठिकाणी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचा प्रभाग सभापती होणार आहे. नाशिकरोड विभागात प्रभाग १७ ते २२ असे सहा प्रभाग आहेत. याठिकाणी भाजपा-१२, शिवसेना-११ असे बलाबल आहे. येथे भाजपा एका संख्येने पुढे असल्याने भाजपाचा प्रभाग सभापती बसणार आहे. सहा पैकी तीन ठिकाणी भाजपाचा प्रभाग सभापती होण्याची शक्यता आहे.