फोनकॉलद्वारे आर्थिक लूट करणाऱ्या तिघांना दिल्लीतून अटक ; नाशिक पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 07:06 PM2019-08-30T19:06:42+5:302019-08-30T19:12:39+5:30

वेगवेगळ््या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून ८१ सीम कार्ड, १० मोबाईल,फिंगर प्रिंट स्कॅनर, १० हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी (दि.३०) आयुक्तलयातील पत्रकार परिषदेत दिली आहे. 

Three robbers arrested from Delhi via phone call; Nashik police action | फोनकॉलद्वारे आर्थिक लूट करणाऱ्या तिघांना दिल्लीतून अटक ; नाशिक पोलिसांची कारवाई

फोनकॉलद्वारे आर्थिक लूट करणाऱ्या तिघांना दिल्लीतून अटक ; नाशिक पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्दे ऑनलाइन फसवणूक करणारे तिगे गजाआड दिल्लीतून चालवत होते बोगस कॉलसेंटर नाशिक पोलीसांनी सापळा रचून केले अटक

नाशिक : वेगवेगळ््या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे. निशांतकुमार ओमप्रकाश सिंग (२३, रा.उत्तर प्रदेश), मोहम्मद रयाझउद्दीन फेजल (२२, रा.पटना, बिहार), तरूणकुमार सिंग (२४, रा.मथुरा, उत्तर प्रदेश)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून यांच्याकडून ८१ सीम कार्ड, १० मोबाईल,फिंगर प्रिंट स्कॅनर, १० हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी (दि.३०) आयुक्तलयातील पत्रकार परिषदेत दिली आहे. 
फोनकॉलद्वारे आपल्या खात्याची माहिती जाणून घेत फसवणूक झाल्या प्रकरणी १२ ते २१ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत फसवणूक झाल्याची फिर्याद नंदु दत्तू भिसे (३०) यांनी दिली होती. या प्रकरणात तिघा संशयितांनी मोबाईलवर भिसे यांच्याश्ी संपर्क साधत स्टेट बँकेतून बोलत असल्याचे भासवून त्यांच्या एटीएमविषयी माहिती घेऊन मोबाईलवर आलेला ओटीपी मागवून घेत १ लाख ८९ हजार ३८६ रुपये आॅनलाईन बँकींगच्या माध्यमातुन परस्पर काढून घेत फसवणुक केली होती.  या प्रकरणाचा सायबर पोलीस शाखेने सखोल तपास केलानंतर तीन जण संगनमताने दिल्लीतून बोगस कॉल सेंटर चालवित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी बँक स्टेटमेंट व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून नवी दिल्लीतील कॉल सेंटरचा पत्ता शोधून स्थानिक पोलीसांच्या मदतीने छापा टाकला. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून १० मोबाईल फोन, फिंगर प्रिंट स्कॅनर, ३४ सिमकार्ड, १० हजार रुपये जप्त केले. तिघांनाही  न्यायायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, तिघांनी १५ लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले असून या मागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: Three robbers arrested from Delhi via phone call; Nashik police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.