नाशिकमध्ये एकाच रात्रीत तीन खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 07:30 IST2017-12-28T01:49:32+5:302017-12-28T07:30:03+5:30
नाशिक - शहरात बुधवारी रात्री तीन खून. रात्री साडेआठ वाजता अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाच्या खुनानंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपत्तीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला.
_201707279.jpg)
नाशिकमध्ये एकाच रात्रीत तीन खून
नाशिक - शहरात बुधवारी रात्री तीन खून. रात्री साडेआठ वाजता अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाच्या खुनानंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपत्तीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला. यापैकी एक सिडकोतील गणेशनगर तर दुसरा राजीवनगर झोपडपट्टीतील असल्याची माहिती मिळते आहे. या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पहिली घटना रात्री साडेनऊ वाजता अंबडमधील रिक्षाचालक साहेबराव जाधव याच्यासोबत घडली. साहेबरावावरील हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपट्टी परिसरात शंभफुटी रस्त्यावर झाली . भांडणाची कुरापत काढत अज्ञात संशयितांनी धारदार हत्याराने दोघांवर हल्ला केला, यात देविदास इगे व दिनेश नीलकंठ बिरासदर यांचा जागीच मृत्यू झाला. जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला. यापैकी एक सिडकोतील गणेशनगर तर दुसरा राजीवनगर झोपडपट्टीतील असल्याची माहिती मिळते आहे.