भोंदू अशोक खरातविरोधात आणखी तीन गुन्हे; एकूण गुन्ह्यांची संख्या सहा; कसून चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 06:15 IST2026-03-24T06:15:04+5:302026-03-24T06:15:04+5:30
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या. त्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

भोंदू अशोक खरातविरोधात आणखी तीन गुन्हे; एकूण गुन्ह्यांची संख्या सहा; कसून चौकशी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : एका विद्यार्थिनीसह दोन महिलांनी भोंदू अशोक खरातविराेधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर सोमवारी आणखी तीन गुन्हे दाखल झाल्याची माहिती एसआयटीने दिली. त्यामुळे बाबाविरोधात आता एकूण सहा गुन्हे दाखल झाले असून, त्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
आज कोर्टात हजर करणार
भोंदू खरातच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी (दि. २४) संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्याची पुन्हा पोलिस कोठडी मागितली जाणार आहे.
चाकणकरांची चौकशी?
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या. त्यांनादेखील चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
तक्रारींसाठी पुढे या : खरातविरोधात तक्रार करण्यासाठी ९५०३२७०२२४/ ७७७५८ १६३८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.