कापड दुकानातून तीन लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:08 IST2018-03-11T00:08:12+5:302018-03-11T00:08:12+5:30
सिन्नर : येथील पाचोरे कॉम्प्लेक्समधील कापड दुकानातून अज्ञात चोरट्यांनी रेडिमेड कापडांचा सुमारे तीन लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

कापड दुकानातून तीन लाखांची चोरी
सिन्नर : येथील पाचोरे कॉम्प्लेक्समधील कापड दुकानातून अज्ञात चोरट्यांनी रेडिमेड कापडांचा सुमारे तीन लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. विंचूरदळवी येथील वैभव कानडे यांनी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर त्यांना दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. आत गेल्यानंतर दुकानातील सर्व रेडिमेड कपडे चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. चोरट्यांनी दुकानातून १५० टी शर्ट, २८० जिन्स पॅँट, १५० फॉर्मल पॅँट, ४०० फॉर्मल शर्ट, बनियन, अंडरवियर असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा माल चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.