शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

शहरात तीन घरफोड्यांत एक लाखांचा ऐवज चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 5:52 PM

विद्याधन बंगल्यात विनायक गणपत वाणी राहतात. ते ९ ते ११ फेब्रुवारीच्या दरम्यान बाहेरगावी गेले होते. या कालावधीत बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून स्वयंपाकघरातून बंगल्यात प्रवेश केला.

ठळक मुद्देदोन ठिकाणची घरे फोडून ५५हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला

नाशिक : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ चोरट्यांनी घरफोडी करून घरातून ५४ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरफोडी, दुचाकीचोरीपासून खूनापर्यंतच्या घटना इंदिरानगर परिसरात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. पोलीसांनी इंदिरानगरमधील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याची मागणी होत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गार्डन कॉलनीजवळ असलेल्या विद्याधन बंगल्यात विनायक गणपत वाणी राहतात. ते ९ ते ११ फेब्रुवारीच्या दरम्यान बाहेरगावी गेले होते. या कालावधीत बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून स्वयंपाकघरातून बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर घरातून ३ ग्रॅम ६४० मिलिग्रॅमचे दहा हजाराचे मंगळसुत्र, १ग्रॅम ५८०मिलिग्रॅम वजनाचे साडेचार हजार रु पयांचे कानातील टॉप, ३ ग्रॅम ७५० मिलिग्रॅमचे साडेनऊ हजार रु पयांचे कानातील टॉप, १ग्रॅम ९५०मिलिग्रॅमची सहा हजार रु पयांची सोन्याची पोत या दागिण्यांसह २४ हजारांची रोकड असा एकूण ५४ हजार रु पयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दांडगे पुढील तपास करीत आहेत.पंचवटीतील रासबिहारी शाळेमागे असलेल्या अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी दोन ठिकाणची घरे फोडून ५५ हजार रु पयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील साईकुंज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुजाता सुहास दरगुडे यांचे व त्यांचे शेजारी रवींद्र त्र्यंबक नांद्रे यांच्या घराचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी हात साफ केला. घरातील दागिणे घेऊन पोबारा केला. या दोन्ही सदनिका बंद होत्या त्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली. दरगुडे, नांद्रे जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना आपल्या घरात घरफोडी करून दागिण्यांची चोरी केली.दरगुडे यांच्या घरातून ४० हजार रु पयांचे दोन तोळे वजनाचे सोन्याने दागिने व नांद्रे यांच्या घरातून १५हजारांची रोकड असा ५५हजार रु पयांचा मुद्देमाल लांबविला. याप्रकरणी अज्ञात घरफोड्यांविरूध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास उपनिरिक्षक गिरमे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय