पाच घटनांमध्ये तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:16 AM2018-11-11T01:16:46+5:302018-11-11T01:17:03+5:30

लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत सोनसाखळी चोरट्यांनी इंदिरानगर व मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत चार, तर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून येत खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ या घटनेत चोरट्यांनी दोन लाख ७० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहे.

 Three lakh jewelery stolen in five cases | पाच घटनांमध्ये तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

पाच घटनांमध्ये तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

Next

इंदिरानगर : लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत सोनसाखळी चोरट्यांनी इंदिरानगर व मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत चार, तर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून येत खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ या घटनेत चोरट्यांनी दोन लाख ७० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहे. या घटनेमुळे महिलावर्गात घबराट पसरली आहे़ दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़  पाथर्डी फाट्यावरील प्रशांतनगरमधील रहिवासी कोमल साळवे या शुक्रवारी (दि़९) स्वामी समर्थ केंद्राजवळून पायी जात असताना समोरून काळा रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एका संशयिताने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेली़ या घटनेनंतर चोरट्यांनी परबनगरकडे मोर्चा वळवून रथचक्र चौकातील भाजीपाला विक्रीचे दुकान बंद करून घरी परतत असलेल्या मनीषा कोतकर (रा़ वामन कृपा हौसिंग सोसायटी) यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली़ या दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अशोका मार्गावरील फेम सिग्नलजवळ राहणाऱ्या भावाला भेटण्यासाठी कल्याण येथून आलेल्या महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दुचाकीवरील संशयिताने खेचून नेल्याची घटना बुधवारी (दि़७) सायंकाळच्या सुमारास घडली़ स्मृती राव (रा़ अ‍ॅब्रेसिया त्रिविनी लॉरेल, बिर्ला कॉलेजमागे, कल्याण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी सात वाजेच्या सुमारासफेम सिग्नलजवळील बँकेजवळून पायी जात असताना दुचाकीवरील संशयिताने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, २० हजार रुपयांचा सोन्याचा हार खेचून नेला़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नासर्डी पुलाजवळून पायी जात असलेल्या प्रियंका वाघ (रा़ हॅपी होम कॉलनी, नाशिक) या महिलेच्या गळ्यातील दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या हेल्मेट घातलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़९) दुपारच्या सुमारास घडली़  या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Three lakh jewelery stolen in five cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.