वेगवेगळ्या अपघातांत युवतीसह तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:03 IST2018-03-15T23:03:34+5:302018-03-15T23:03:34+5:30
सिन्नर : मालवाहतूक रिक्षातून पडून सोळा वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना हिवरगाव शिवारातील घंगाळवाडी फाट्याजवळ बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

वेगवेगळ्या अपघातांत युवतीसह तिघे ठार
सिन्नर : मालवाहतूक रिक्षातून पडून सोळा वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना हिवरगाव शिवारातील घंगाळवाडी फाट्याजवळ बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
राणी निवृत्ती पोमनार (१६), रा. हिवरगाव असे मयत युवतीचे नाव आहे. राणी बहिणीसोबत वडांगळीला आठवडे बाजार करण्यासाठी गेली होती. बाजार करून दोघी बहिणी मालवाहतूक रिक्षाने घरी जात होत्या. यावेळी फाट्याजवळ चालत्या रिक्षातून खाली पडल्याने राणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी राणीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार एस. डी. गायकवाड आणि धनाजी जाधव अधिक तपास करत आहेत.दुचाकींची धडक; एक ठार, तीन जखमीसिन्नर : सिन्नर-घोटी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तालुक्यातील फर्दापूर येथील युवक ठार झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. फर्दापूर येथील मुकेश अंबादास नाईक व त्याचा भाऊ अमोल नाईक हे दुचाकीहून सिन्नरकडून सोनारीला जात होते. सिन्नर-घोटी रस्त्यावर बंधन लॉन्सजवळ दोन दुचाकींची धडक झाली. या अपघातात मुकेश नाईक (३०) याचा मृत्यू झाला, तर अमोल जखमी झाला. त्याच्यावर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर समोरच्या दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. त्यांना एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.पांढुर्ली येथील युवक ठारपांढुर्ली-भगूर रस्त्यावर दारणा नदीच्या कथड्यावर आदळून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. अनिल तानाजी केदार (२५, रा. पांढुर्ली) असे मृत युवकाचे नाव आहे. अनिल हे वडील तानाजी विश्वनाथ केदार (५५) यांच्या सोबत दुचाकीने (एमएच १५, ईएन ५८१५) बहिणीच्या विवाहाच्या कामानिमित्त भगूर येथे गेले होते. रात्री काम आटोपून बाप-लेक पांढुर्ली येथे घरी परतत होते. दारणा पुलावर समोरून आलेल्या वाहनाच्या तीव्र प्रकाशाने व त्यात समोरचे काही न दिसल्याने केदार यांची दुचाकी कथड्यावर जाऊन आदळली. या अपघातात अनिल केदार यांचा जागीच मृत्यू झाला, तर वडील तानाजी केदार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.