शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

मालेगाव तालुक्यात तिघा शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 1:22 AM

कांद्याला बाजारात मिळत असलेला कवडीमोल भाव, दुष्काळी स्थिती, कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून तालुक्यातील तीन शेतकºयांनी एकाच दिवशी आत्महत्या केली. कंधाणे, सायने खुर्द आणि नांदगाव बुद्रुक येथील हे शेतकरी असून, त्यातील दोघा शेतकºयांनी विष प्राशन करून जीवन संपवले, तर नांदगाव बुद्रुक येथील शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देहृदयद्रावक : कर्जाच्या परतफेडीची चिंता

मालेगाव : कांद्याला बाजारात मिळत असलेला कवडीमोल भाव, दुष्काळी स्थिती, कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून तालुक्यातील तीन शेतकºयांनी एकाच दिवशी आत्महत्या केली. कंधाणे, सायने खुर्द आणि नांदगाव बुद्रुक येथील हे शेतकरी असून, त्यातील दोघा शेतकºयांनी विष प्राशन करून जीवन संपवले, तर नांदगाव बुद्रुक येथील शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली.कंधाणे येथील ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर (३५) या तरुण शेतकºयाने शेतात साठवलेल्या कांद्याच्या ढिगाºयाजवळच विष प्राशन केले. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. ज्ञानेश्वर यांच्या नावावर कंधाणे शिवारात तर त्यांचे वडील दशरथ व आई मथुराबाई शिवणकर यांच्या नावे प्रत्येकी एक हेक्टर क्षेत्र आहे. त्यांच्यावर विविध कार्यकारी सेवा प्रत्येकी ७५ हजार रुपये पीककर्ज आहे.कर्जमाफी योजनेचा त्यांना लाभ मिळाला नाही. ज्ञानेश्वर यांनी कांदा पिकाची लागवड केली होती. कांदा शेतातच साठवून ठेवला होता. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने साठविलेल्या कांद्याला कोंब फुटले होते.  उत्पादित केलेल्या कांद्याला बाजारभाव मिळणार नाही. उत्पादन खर्चही निघणार नाही. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून ज्ञानेश्वरने कांद्याच्या ढिगाºयाजवळ विष प्राशन करून आत्महत्या केली.चिंधा ओंकार शिवणकर यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थ व त्यांच्या कुटुंबीयांना दिली. ज्ञानेश्वरच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती तहसीलदार ज्योती देवरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, माजी सभापती धर्मराज पवार, निंबा पवार, सूर्यभान भोईटे, दत्तू गवांदे, राजधर पवार, विकास पवार, सोपान गावडे, तलाठी पी. एम. बनसोड आदी उपस्थित होते.इन्फो‘कांदाले भाव नही, कांदा ईकी पैसा परत करी द्वित असे म्हणीसन मणा भाऊ वावरात वनता’ असे म्हणत ज्ञानेश्वरच्या वडिलांनी अश्रू ढाळत भावनांचा बांध मोकळा केल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकारी व शेतकºयांना गहिवरून आले होते. शेतकºयांनी दशरथ शिवणकर यांचे सांत्वन करीत त्यांना घटनास्थळावरून दूर नेले. या हृदयद्रावक घटनेने साºयांचे डोळे पाणावले.इन्फोसायने खुर्दच्या शेतकºयाचे विषप्राशनघर बांधण्यासाठी खासगी बॅँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून आलेल्या नैराश्येतून तालुक्यातील सायने खुर्द येथील वसंत बंकट सोनवणे (५५) या शेतकºयाने गुरुवारी विष प्राशन केले होते. शुक्रवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वसंत पाटील यांच्या नावावर सायने खुर्द शिवारातील गट क्रमांक १६५/३ मध्ये ७५ आर क्षेत्र आहे. त्यांच्यावर दसाणे सोसायटीचे दीड लाख रुपये कर्ज आहे. सततचा दुष्काळ, शेती उत्पादनात झालेली घट, खासगी बॅँकेकडून घेतलेले कर्ज व सोसायटीच्या कर्जाची परतफेड कशी करायची या नैराश्येतून त्यांनी गुरुवारी विष प्राशन केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. तालुका कृषी अधिकारी गोकूळ अहिरे यांनी सोनवणे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. कृषी व महसूल विभागाने पंचनामा केला आहे.इन्फोनांदगाव बुद्रुकला गळफास घेऊन आत्महत्यातालुक्यातील नांदगाव बु।। येथे चेतन केदा बच्छाव (२३) या अविवाहित तरुण शेतकºयाने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चेतन याने गट क्रमांक १२८/१ अ मधील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या नावावर ६५ हजार रुपयांचे कर्ज आहे, तर नाशिक येथील फायनान्स कंपनीचे ५ लाख २१ हजार १६७ रुपये कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड कशी करायची यातून आलेल्या नैराश्यातून चेतन याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात दोन विवाहित बहिणी आहेत. त्याच्या नावावर गट क्रमांक १२८/१ अ मधील १.०७ पोटखराबा ०.०४ हेक्टर शेतजमीन आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयात शेतकरी आत्महत्या केल्याची प्राथमिक नोंद घेण्यात आली आहे

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या