शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

तीन दिवसांचा वीकेण्ड : थंडीत कॅम्पींग अन् बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर भंडारदर्‍यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 6:59 PM

‘कॅम्पींग’चा आनंद लुटणा-यांची संख्या अधिक असून येथे जत्रा भरली आहे. भंडारदरा गाईड समुहाकडून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन सर्व पर्यटकांना केले आहे.

ठळक मुद्देधरणाच्या बॅकवॉटरभोवती सुमारे दोनशेहून अधिक तंबूभंडारदरा हे पर्यटनस्थळ नाशिकपासून ७० किलोमीटर अंतरावर शैक्षणिक सहली धार्मिक पर्यटनासाठी नाशिकमध्ये आदिवासी तरुणांंना रोजगारनिर्मिती

नाशिक : चौथा शनिवार व ख्रिसमसच्या शासकिय सुटीमुळे यंदा सलग तीन दिवस जोडून सुट्टया आल्या. या संधीचा फायदा घेत नाशिककर मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडले. नाशिकककरांचे आवडते ठिकाण असलेले व निसर्गसंपदेने नटलेले भंडारदरा हे जवळचे डेस्टिनेशन बहुतांश कुटुंबियांनी गाठले आहे. बॅकवॉटरभोवती बोच-या थंडीत कॅम्पींगचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकभंडारर्‍याला शनिवारी सकाळपासून दाखल झाले आहेत. धरणाच्या बॅकवॉटरभोवती सुमारे दोनशेहून अधिक तंबू पडले आहेत.डिसेंबर महिन्यात नाताळ अर्थात ख्रिसमसच्या विविध शाळांना किमान आठवडाभराची सुटी असते. या सुटीचा फायदा घेत बहुतांश कुटुंब पर्यटनासाठी विविध पर्यटन स्थळांना जाण्याचा बेत आखतात. यंदा मात्र वीकेण्ड तीन दिवसांचा मिळाल्याने नाशिककरांचा आनंद अधिक द्विगुणित झाला आहे. वीकेण्डला ख्रिसमस आल्यामुळे तीन दिवसांचा पर्यटनासाठी वेळ नागरिकांना मिळाला. यामुळे नागरिक कुटुंबांसह घराबाहेर पडले. शहरातील बसस्थानकांवर गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे भाविक पर्यटकांचीदेखील संख्या शहरात वाढल्याचे चित्र पहावयास मिळाले.

‘कॅम्पींग’साठी भंडारदर्‍याला जत्रा...भंडारदरा हे पर्यटनस्थळ नाशिक-नगरच्या सीमेवर आहे. नाशिकपासून ७० किलोमीटर अंतरावर असल्या या पर्यटनस्थळावर मोठ्या संख्येने नाशिक, मुंबई, पुणे या शहरांमधून पर्यटकांचे समुह दाखल झाले आहेत. या वीके ण्डच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरणाच्या बॅकवॉटरभोवती रात्रीच्या वेळी ‘कॅम्पींग’चा आनंद लुटणा-यांची संख्या अधिक असून येथे जत्रा भरली आहे. भंडारदरा गाईड समुहाकडून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन सर्व पर्यटकांना केले आहे.शैक्षणिक सहली धार्मिक पर्यटनासाठी नाशिकमध्येगोदाकाठ, पंचवटी, तपोवन परिसरात भाविक पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील गोदाकाठ, गंगापूर धरण, फाळके स्मारक, पांडवलेणी, तपोवन, बॉटनिकल गार्डन, यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटर आदि ठिकाणांना भेटी देण्यासाठी काही शाळांच्या सहलीही दाखल झाल्या होत्या. एकूणच शहरात पर्यटनाच्या दृष्टीने पुढील तीन दिवसांमध्येही गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर हंगामी विक्रेत्यांनी सज्जता दाखविली असून पर्यटनस्थळांभोवती विविध खाद्यपदार्थ विक्री करणा-या विक्रेत्यांकडून हा तीन दिवसांचा ‘वीकेण्ड’ ‘कॅच’ केला जाणार आहे.

बहुतांश नाशिककर भंडारदर्‍यालाबॅकवॉटरभोवती २५० ते ३०० तंबू विविध कॅम्पींगसुविधा देणाºया स्थानिक आदिवासी युवकांनी ठोकले आहेत. तरुणाईसह कुटुंबांसमवेत कॅम्पींगचा आनंद लुटणा-यांची संख्या यंदा अधिक आहे. बहुतांश नाशिककरदेखील वीकेण्ड सेलिब्रेशन ‘कॅम्पींग’च्या माध्यमातून करण्यासाठी भंदारद-याला पोहचले आहेत. एकूणच या माध्यमातून येथील आदिवासी तरुणांंना रोजगारनिर्मिती झाली आहे. कॅम्पींग, बोटींगला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

-केशव खाडे, गाईड, अमेझिंग भंडारदरा पर्यटन संस्था

टॅग्स :tourismपर्यटनNashikनाशिकdam tourismधरण पर्यटन