बालसुधारगृहातून तीन मुलांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:22 IST2019-12-21T00:21:44+5:302019-12-21T00:22:36+5:30
मनमाड येथील बालसुधारगृहातून तीन मुलांनी पलायन केले असल्याची तक्र ार बालसुधारगृहाचे कर्मचारी अक्षय रमेश डिंबर यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे

बालसुधारगृहातून तीन मुलांचे पलायन
मनमाड : येथील बालसुधारगृहातून तीन मुलांनी पलायन केले असल्याची तक्र ार बालसुधारगृहाचे कर्मचारी अक्षय रमेश डिंबर यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या सुधारगृहात एकूण २२ मुले वास्तव्यास आहे. १६ तारखेला रात्री झोपताना २२ मुले हजर असली तरी पहाटे मात्र तीन मुले कमी असल्याची बाब निदर्शनास आली. सर्वत्र शोधाशोध करूनही मुले आढळून न आल्याने आज मनमाड शहर पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. पलायन केलेल्या मुलांमध्ये एक जण मालेगाव तर दोन जण उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगण्यात आले.