शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...या तर चोराच्या उलट्या बोंबा; राऊतांवर हल्लाबोल, भाजपचे तीनही आमदार आक्रमक

By suyog.joshi | Updated: October 20, 2023 19:23 IST

ललित पाटील याला आम्ही जावई म्हणून सोडलेला नाही तर पकडलेला आहे असे फरांदे यांनी सांगितले. 

नाशिक: शिवसेना नेते संजय राऊत हे मनोरूग्ण असून त्यांची नार्को टेस्ट करा असे सांगत राऊतांचे आरोप म्हणजे या तर चोराच्या उलट्या बोंबा असा प्रतिहल्ला शहरातील तीनही भाजपच्या आमदारांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे व राहुल ढिकले यांनी राऊत यांच्या तोफ डागली. यावेळी फरांदे म्हणाल्या, ललित पाटील शिवसेनेचा पदाधिकारी आहे. संजय राऊत सकाळी उठून बोलतात, एक तर संजय राऊत हे मनोरुग्ण आहेत नाही तर ते अमली पदार्थांचे सेवन करत असतील. त्यांची नार्को टेस्ट करावी. मुंबई पोलिसांनी नाशकात येऊन कारखाना उध्वस्त केला, सोलापूरला कारखाना उध्वस्त केला आणि ललित पाटील याला अटक केल्यानंतर ठाकरे गटाने नाशिकला मोर्चा काढला? ललित पाटील याला अटक केली तेव्हा मोर्चा का काढला नाही असा प्रश्न फरांदे यांनी उपस्थित केला. 

ललित पाटील प्रकरणी आम्ही नेहमी विधानसभेत गृहमंत्र्यांशी चर्चा केली. गृहखाते त्याबाबत कारवाई करत आहे. शिवसेनेला जाणारा हप्ता बंद झाल्यानेच आजचा मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप करत फरांदे यांनी सांगितले की, उबाठा शिवसेनेने ड्रग्जप्रकरणी राजकारण थांबवावे. अभिनेता सुशांतसिंह राजपुत प्रकरणातही ड्रग्ज रॅकेट दाबले गेले. त्याला दोषी कोण? असा प्रतिप्रश्न फरांदे यांनी उपस्थित केला. राऊत यांनी जर पुरावे असतील तर सादर करावे असे फरांदे यांनी सांगत ड्रग माफियावर मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी कधीही कारवाई केली नाही असा आरोप केला. उध्दव ठाकरे यांच्या काळात व्यापाऱ्यांचे अपहरहण केलं जातं होत आणि खून केला आणि इथे येऊन जर तुम्ही नाकाने कांदे सोलत असाल तर हे दुर्दैव आहे.

आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही पोलिसांना देऊ. शहराला ड्रग मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून या विषयात जर सरकारी अधिकारी चालढकल करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल असेल प्रकार खपवून घेणार नाही. यावेळी मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विजय साने आदी उपस्थित हाेते. ....तर अब्रूुनुकसानीचा दावा ठोकणारउबाठा सेनेतर्फे ड्रग्जप्रकरणात राजकारण केले जात आहे. गुंडांना पक्षात घेऊन नाचणारा आमचा पक्ष नाही. आमच्यावर नाव घेऊन आरोप केल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा अमादार राहुल ढिकले यांनी दिला. ड्रग तसेच रोलेट गेम विरोधात आम्ही कायम आवाज उठवलेला आहे. ललित पाटील याला आम्ही जावई म्हणून सोडलेला नाही तर पकडलेला आहे असे फरांदे यांनी सांगितले.  

टॅग्स :NashikनाशिकSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा