शहरातून बुलेटसह तीन दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:33 IST2018-08-18T00:32:56+5:302018-08-18T00:33:12+5:30

शहरातील दुचाकीचोरीचे प्रकार सुरुच असून पंचवटी परिसरातून दोन तर इंदिरानगर परिसरातून एक अशा तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकींमध्ये बुलेटचाही समावेश आहे़

 Three bicycle theft with bullets from the city | शहरातून बुलेटसह तीन दुचाकींची चोरी

शहरातून बुलेटसह तीन दुचाकींची चोरी

नाशिक : शहरातील दुचाकीचोरीचे प्रकार सुरुच असून पंचवटी परिसरातून दोन तर इंदिरानगर परिसरातून एक अशा तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकींमध्ये बुलेटचाही समावेश आहे़  पेठ तालुक्यातील कोहोर येथील रहिवासी काशीनाथ बाळू गायकवाड यांची पन्नास हजार रुपयांची रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच १५ एबी २२३९) चोरट्यांनी पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डाजवळ असलेल्या हॉटेलसमोरून चोरून नेली़ दुचाकी चोरीची दुसरी घटना पेठरोडवरील दत्तनगरमध्ये घडली़ गुरुमाऊली सोसायटीतील रहिवासी सुभाष साळवे यांची ३५ हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच १५ ईटी ००९४) चोरट्यांनी पटेल कॉलनीतून चोरून नेली़  तर दुचाकी चोरीची तिसरी घटना पाथर्डी फाट्यावरील ज्ञानेश्वर नगरमध्ये घडली़ प्रशांत बच्छाव यांची ३५ हजार रुपये किमतीची होंडा दुचाकी (एमएच १५ ईएम ४०६२) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Three bicycle theft with bullets from the city