साडेतीन लाख रु पयांचा ऐवज निफाडला घरफोडीत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:15 IST2020-08-23T20:58:42+5:302020-08-24T00:15:21+5:30

निफाड : शहरातील बालाजीनगर भागात शनिवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास घरफोडी होऊन सुमारे रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण साडेतीन लाख रु पयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली आहे.

Three and a half lakh rupees was stolen | साडेतीन लाख रु पयांचा ऐवज निफाडला घरफोडीत लंपास

साडेतीन लाख रु पयांचा ऐवज निफाडला घरफोडीत लंपास

ठळक मुद्देश्वानाने उगाव रोड पर्यंत माग दाखवला.

निफाड : शहरातील बालाजीनगर भागात शनिवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास घरफोडी होऊन सुमारे रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण साडेतीन लाख रु पयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली आहे.
निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड शहरातील बालाजीनगर भागात राहणारे अ‍ॅड अमोल शिंदे हे शनिवारी घराला कुलूप लावून कुटुंबासह शिंगवे गेले होत.े घरी कुणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम पंधरा हजार व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ४४ हजार रु पयांचा ऐवज लंपास केला आहे.
निफाड पोलिसांनी रविवारी सकाळी श्वानपथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. श्वानाने उगाव रोड पर्यंत माग दाखवला. या प्रकरणी निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी व पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Three and a half lakh rupees was stolen