नाशिक : सराफ बाजारातील एका दुकानातील सोन्याचे डिझाइन बनविणाऱ्या व्यक्तीकडून आठ तोळे वजनाची लड मंगळसूत्र बनविण्यासाठी घेऊन गेल्यानंतर सोने अथवा मंगळसूत्र परत न देता अपहार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ बाजारातील रंगनाथ भाऊशेठ आडगावकर या दुकानातून ८० ग्रॅम वजनाची सोन्याची आयताकार लगड घेऊन जात डिझाइन बनविणारा कारागीर संजय वसंतराव उदावंत याच्याकडून पश्चिम बंगाल येथील हुबळी बालहिजारी येथील मृत्युंजय महादेव कांजी याने मंगळसूत्र बनवून न देता विश्वासघात करीत अपहार केल्याची घटना घडली. याप्रकरणी या दुकानातील डिझाइन बनविणाऱ्या संजय वसंतराव उदावंत यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार संशयित आरोपी मृत्युंजय महादेव कांजी यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपोवन पंचवटी परिसरातील गणेशनगर येथील मधुर रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट नंबर पाचमधून अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातून ९६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. मधुर रेसिडेन्सीमधील या घरफोडीविषयी फ्लॅट मालक मयूर अण्णासाहेब बोरसे (३०) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याने मयूर बोरसे यांच्या फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातील ड्रॉव्हरमधील रोख रक्कमेसह ९६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असून, पोलिसांनी बोरसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयिताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे.
विश्वासघात व घरफोडीच्या प्रकरणात साडेतीन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:41 IST
नाशकात एका दुकानातील सोन्याचे डिझाइन बनविणाऱ्या व्यक्तीकडून आठ तोळे वजनाची लड मंगळसूत्र बनविण्यासाठी घेऊन गेल्यानंतर सोने अथवा मंगळसूत्र परत न देता अपहार केल्याची घटना घडली. तर दुसऱ्या घटनेत अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातून ९६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
विश्वासघात व घरफोडीच्या प्रकरणात साडेतीन लाखांची फसवणूक
ठळक मुद्देनाशिकमध्ये घरफोडी, फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढसराफ बाजारात अडीच लाख रुपयांचे सोने घेऊन फसवणूक पंचवटी, तपोवन परिसरातील गणेशनगरमध्ये घरफोडी