महिलेचा विनयभंग करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 19:42 IST2020-02-14T19:37:09+5:302020-02-14T19:42:47+5:30
पंचवटी परिसरातील एका महिलेच्या पतीने हात उसनवार घेतलेले पैसे परत केल्यानंतरही पुन्हा पैशाची मागणी करून फिर्यादी महिलेच्या घरी येऊन तसेच तिच्या पतीला फोनवर वारंवार शिवीगाळ करीत महिलेचा हात पकडून अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघा संशयितांवर पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेचा विनयभंग करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
नाशिक : पंचवटी परिसरातील एका महिलेच्या पतीने हात उसनवार घेतलेले पैसे परत केल्यानंतरही पुन्हा पैशाची मागणी करून फिर्यादी महिलेच्या घरी येऊन तसेच तिच्या पतीला फोनवर वारंवार शिवीगाळ करीत महिलेचा हात पकडून अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघा संशयितांवर पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मखमलाबाद नाका परिसरात राहणाऱ्या महिलेने संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे.
मखमलाबाद नाका परिसरात राहणाºया एका महिलेच्या पतीने हिरावाडी तील गोकुळधाम येथे राहणाºया संशयित संतोष रघुनाथ तारगे, रघुनाथ तारगे व संतोषची आई यांच्याकडून काही दिवसांपूर्वी सात लाख पंचवीस हजार रुपये रक्कम हात उसनवार घेतली होती. त्याबदल्यात १७ लाख रुपयांची रक्कम परत केल्यानंतरही संशयित आरोपीने महिलेच्या पतीला वारंवार फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच गेल्या आठवड्यात संशयिताने तक्रारदार महिलेच्या घरी येऊन तिच्या सासु-सासऱ्यांना मारहाण व शिवीगाळही केली. त्यानंतर त्या महिलेचा हात पकडून पैसे दिले नाही तर तुज्या पतीला गल्लीत मारेल अशी धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.