पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:14 IST2018-06-17T00:14:07+5:302018-06-17T00:14:07+5:30
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसानंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसानंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यात मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर आठवडाभराचा कालावधी उलटूनही पावसाचे आगमन झालेले नाही. दररोज आभाळ भरून येणे, सोसाट्याचा वारा असे वातावरण होत असून, पावसाचे आगमन मात्र होत नसल्याने सर्वांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मृग नक्षत्र कोरडेच जाते की काय? अशी चिंता शेतकºयांमध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतीची सुरू असलेली कामे पावसाच्या दांडीमुळे संथ गतीने सुरू आहे.