घोलप यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:40 AM2018-07-31T01:40:40+5:302018-07-31T01:41:13+5:30

मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विहितगाव येथे सोमवारी आमदार योगेश घोलप यांच्या घरासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 Thoya agitation against Gholap's house | घोलप यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

घोलप यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

Next

नाशिकरोड : मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विहितगाव येथे सोमवारी आमदार योगेश घोलप यांच्या घरासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.  मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी सकाळी विहितगाव येथे आमदार योगेश घोलप यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.  मराठा आरक्षण संदर्भात आयोजित बैठकीसाठी आमदार योगेश घोलप मुंबईला गेले असल्याने आंदोलनकर्त्यांची माजी मंत्री बबनराव घोलप यांनी भेट घेतली.  यावेळी करण गायकर, योगेश मिसाळ, गणेश कदम, अमोल शिंदे आदिंनी एक दिवसाच्या आंदोलनासाठी मराठा समाजाला जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून न दिल्याने निषेध व्यक्त केला. गेली २५ वर्षांपासून घोलप देवळाली मतदार संघाचे प्रतिनिधित्व केवळ  मराठा समाजाच्या पाठिंब्यावरच करत आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून आमदार घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच भविष्यात निवडणूक लढविल्यास सकल मराठा समाज घोलप यांच्या पाठिशी उभा राहील असे सांगत आंदोलनकर्त्यांनी मराठा समाजासाठी देवळाली मतदार संघात अद्यावत मराठा भवन अभ्यासिका उभी करावी अशी मागणी केली.
यावेळी ठिय्या आंदोलनामध्ये समन्वय समितीचे करन गायकर, योगेश निसाळ, उमेश शिंदे, डॉ. अमोल वाजे, राजेंद्र लांडगे, गणेश कदम, तुषार जगताप, विलास कानमहाले, पूजा धुमाळ, माधवी पाटील, वैभव दळवी, केशव पोरजे, प्रकाश म्हस्के, साहेबराव खर्जुल, सचिन हांडगे, चंद्रकांत गोडसे, योगेश म्हस्के, कृष्णा लवटे, राजु फोकणे, वैभव पाळदे, अनिल ढिकले, नितीन खर्जुल, तानाजी भोर, शरद जगताप आदि सहभागी झाले होते.
...तर योगेश घोलपही राजीनामा देतील
मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे. सकल मराठा समाजातील गोरगरीब व सर्वसामान्यांना आरक्षणाची गरज असून, त्याकरिता आपला पूर्ण पाठिंबा आहे. गरज पडल्यास आमदार योगेश घोलप हेदेखील आपल्या आमदारकीचा राजीनामा थेट विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करतील.  - बबनराव घोलप, माजी मंत्री

Web Title:  Thoya agitation against Gholap's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.