शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

मधूमेहमुक्त विश्वासाठी नाशिककर रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 1:54 PM

ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणिऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्रीडी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान हजारो नाशिककरांनी रस्त्यावर उतरून पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम केला.

ठळक मुद्देहजारो नाशिककरांनी केला चालण्याचा व्यायाम थ्री डी वॉकेथॉनमधून लठपणा व मधूमेहमुक्तीचा संदेशडॉ. श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतीदिनानिमित्त कृतज्ञता

नाशिक : ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणिऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्रीडी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान हजारो नाशिककरांनी रस्त्यावर उतरून पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम केला.

लठठ्पणा व मधुमेह मुक्तीचा संदेश विश्वभरात पोहचविण्यासाठी  या ‘थ्री डी (डॉ. दिक्षित डायट) वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. दररोज चालणे हा उत्तम व्यायाम असून शरीर निरोगी राहण्यास मदत होते तसेच विविध आजारापासून मुक्ती मिळते, त्यासाठी ‘लठ्ठपणा व मधूमेह मुक्त विश्व’ मोहीत सहभागी  होण्याचे आवाहन करीत डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी रविवार (दि. १५)इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथून वॉकेथानला झेंडा दाखवून सुरुवात केली. जॉगींग ट्रकनंतर साईनाथ नगर चौफुली,बापू बंगला, सावरकर चौक, राजे छत्रपती चौक, सार्थकनगर बस थांबामार्गे गुरुगोविंद सिंग महाविद्यालयपर्यंत हजारो नाशिककरांनी पायी चालण्याचा व्यायाम करीत वॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदविला.  यावेळी नाशिककरांना मार्गदर्शन करताना मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीमेच्या माध्यमातून जगभरात भारत, अमेरिका, कोरीया, मलेशिया, सिंगापूर आॅस्ट्रेलिया आणि वेगवेगळ््या आखाती राष्ट्रांसह विविध वीस देशांमधील सुमारे १९४ शहरांमध्ये थ्री डी वॉकेथॉनच्या माध्यामतून सुमारे ५० हजारहून अधिक नागरिकांनी सुदृढ आरोग्यासाठी वॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.  भारतात नाशिकसह दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, गोवा बेळगाव, औरंगाबाद, गडचिरोली,फलटण, कराडसह नांदुरा यासारख्या गाव खेड्यांच्या ठिकाणीही रविवारी (दि.१५) सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान हजारो नागरिकांनी पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांनीच आपले आयुष्य नोरोगी आणि सुदृढ राखण्यासाठी वेळ दोन वेळा जेवणे आणि ४५ मिनिटांत साडेचार किलोमीटर चालण्याचा व्यायाम ही आपली जीवनशैली बनविण्याची गरज असल्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्क केली. 

सहभागी नागरिकांना प्रमाणपत्रथ्री डी वॉकेथॉनमध्ये सहभाही झालेल्या सर्व नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रमाणपत्रावर मागच्या बाजूला ‘लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्ती’ मोहीमेत सहभागी होण्याची प्रक्रिया विशद करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांनी आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी, मधूमेह मुक्तीसाठी  ‘लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त विश्व’ मोहीमेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश असल्याचे डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिकdiabetesमधुमेह