शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमधील आदोलानात हजारो नाशिककर घेणार सहभाग; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची माहीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 17:09 IST

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी १६ जूनपासून आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली असून या आंदोलनाचा एल्गार कोल्हापूरमधून करण्यात येणार आहे. या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाचे हजारो आंदोलक सहभागी होणार असल्याची महिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देखासदार संभाजीराजे भोसले यांच्या भूमिकेला नाशिकमधून पाठींबा कोल्हापूरमधील आंदोलनात हजारो नाशिककर आंजोलक सहभाग घेणार

नाशिक :मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी १६ जूनपासून आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली असून या आंदोलनाचा एल्गार कोल्हापूरमधून करण्यात येणार आहे. या आंदोलनात नाशिकमधूनमराठा क्रांती मोर्चाचे हजारो आंदोलक सहभागी होणार असल्याची महिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे सोमवारी शासकीय विश्रागृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, नाशिकमधील सकल मराठा समाजाने तन-मन-धनाने या आंदोलनात सहभागी होऊन छत्रपतींच्या आंदोलनाला बळ देण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले. किल्ले रायगडावर रविवारी (दि. ६) राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आंदोलन यशस्वी करण्यासाठी आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार गाव, तालुकानिहाय समित्या स्थापन करून विविध जबाबदाऱ्या सोपविण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्यास जशास तसे उत्तर देण्याचा ठरावही बैठकीत करण्यात आला.यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर, शिवाजी सहाणे, राजू देसले, गणेश कदम, शरद तुंगार, योगेश कापसे, उमेश शिंदे, संतोष माळोदे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, शरद शिंदे, अमित नडगे, विलास जाधव, ज्ञानेश्वर भोसले, सचिन पाटील, तुषार भोसले, गुंजाळ, राहुल पाटील, सुनील बोराडे, मच्छिंद्र खुळे, श्याम खांडबहाले, विजय पाटील, भरत पाटील, काजल गुंजाळ, संदीप पवार, अतिश जाधव, भूषण तनपुरे आदी समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNashikनाशिकagitationआंदोलनmarathaमराठाkolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती