सदिच्छानगर येथील दोन लाखांच्या तीन म्हशी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 01:05 IST2018-08-30T01:04:48+5:302018-08-30T01:05:07+5:30

सदिच्छानगर येथील मैदानावर चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या दोन लाख किमतीच्या तीन म्हशी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़

Thirty two lakhs of two lakhs of money stolen in Sadikshnagar | सदिच्छानगर येथील दोन लाखांच्या तीन म्हशी चोरीस

सदिच्छानगर येथील दोन लाखांच्या तीन म्हशी चोरीस

इंदिरानगर : सदिच्छानगर येथील मैदानावर चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या दोन लाख किमतीच्या तीन म्हशी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश पांजगे (२५, रा़ रविकिरण कॉलनी, चेतनानगर) यांच्या तीन म्हशी, रेडा व चाळीस बकऱ्या आहेत़ या जनावरांचा सांभाळ त्यांचे आई-वडील करीत असून, शुक्रवारी (दि़२४) सकाळी दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सदिच्छानगरलगत असलेल्या मैदानावर चरण्यासाठी घेऊन गेले होते़ दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते बकºया घरी घेऊन गेले आणि म्हशी तेथेच चरण्यासाठी सोडून दिल्या़ यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास म्हशी आणण्यासाठी मैदानावर गेले असता त्या जागेवर नव्हत्या़ त्यांनी परिसरात तसेच आजूबाजूच्या गोठ्यांमध्ये शोध घेतला मात्र म्हशींचा तपास लागला नाही़ अखेर पोलीस ठाणे गाठून म्हशी चोरीला गेल्याची फिर्याद नोंदविली़

Web Title: Thirty two lakhs of two lakhs of money stolen in Sadikshnagar